![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/05/Picsart_23-05-27_13-29-34-302-1024x768.jpg)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
कलाक्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार
तळेगाव दाभाडे :
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कलाक्षेत्रातील कलाकारांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे व गणेश काकडे यांनी दिली.
वर्धापन दिन कार्यक्रम येत्या ३१ मे रोजी सायंकाळी सहा वाजता कै. गोळवलकर गुरुजी क्रीडांगण (गोल मैदान) यशवंत नगर, तळेगाव स्टेशन येथे संपन्न होणार आहे. आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी व अभिनेत्री रुपाली भोसले यांना कलागौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच प्रसिद्ध लेखक प्रभाकर ओव्हाळ, मधमाशीपालन क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळवणारे विजय सावंत, कलापिनीची कलाकार सायली रौंधळ (नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी), अविनाश नांगरे (चिमणी संवर्धन आणि पालन), नयनाताई डोळस (गतिमंद मुलांच्या क्रीडा प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुख्य प्रशिक्षक) यांचा विशेष गौरव अभिनेते व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचे हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नियामक मंडळ सदस्य विजय चौगुले, अभिनेते राजन भिसे, विजय गोखले, सविता मालपेकर, गार्गी फुले उपस्थित राहणार आहेत.
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/05/Picsart_23-05-24_13-32-42-691-5-721x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/05/Picsart_23-05-03_07-55-34-670-37-880x1024.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/05/Picsart_22-10-23_17-08-56-367-89-1024x728.jpg)
![](https://mavalsatya.com/wp-content/uploads/2023/05/Picsart_22-08-30_16-40-52-618-37-1024x932.jpg)