
“चंद्र तेथे चंद्रिका- शंभू तिथे अंबिका!
संत तिथे विवेका असणे की जे!
मित्रांनो,
ज्ञानेश्वर माऊली म्हणतात त्यात खूपच अर्थ आहे! तथ्य आहे कारण– काही लोकांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून अनेकांना त्यांचा मत्सर वाटतो! त्यांचा कधीकधी हेवाही वाटतो! काही असेही लोक असतात .
या त्यांच्या या हसण्याबद्दल संशयही व्यक्त करतात म्हणूनच त्याबद्दलही ते सारखे सारखे प्रश्न ही विचारीत असतात की नेहमीच तुझा असा हसरा चेहराच आम्हाला का दिसतो? तुझ्या आयुष्यात तुला कधी काहीच समस्या आली नाही का? तुला कधी कोणाचा राग येत नाही का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं देतांना हा माणूस यावर फक्त हसत असतो! शेवटी खोदून विचारल्यावर तो म्हणतो -मला दुसऱ्याचा आनंद बघून मला कधीही दुःख वाटत नाही! एवढेच नव्हे तर मी एक तत्व स्वीकारलेलं आहे की_ माझं दुखणं मी दुसऱ्या कोणालाही सांगत बसत नाही! कारण ताण-तणाव तर प्रत्येकालाच आयुष्यात येतच असतात.
मी सुद्धा त्याला अपवाद कसा असणार? मी त्यांना उत्तर देतो की मित्रा- फक्त फरक एवढाच आहे की मी हसतमुखानं त्या सर्व संकटांना समस्यांना ताणतणावांना अगदी ठरवूनच हसतमुखाने सामोरं जातो! मित्रांनो इतक्या साध्या सरळ सोप्या भाषेत तो त्याच्या हसण्याचं उत्तर देतो.
पण आपण जेव्हा याचा खोलात जाऊन विचार केला तर- त्याच्यात आणि आपल्यात फरक काय आहे? तर त्यातीलच रहस्य आपण आज जाणून घेऊया! मंडळी– ही माणसं कधीच अपुरा अभ्यास किंवा अपुरी माहिती घेत नाहीत तर ते सर्व काम डोळे उघडे ठेवून करतात!ते प्रत्येक गोष्टीच डोळसपणे निरीक्षण परीक्षण आणि समीक्षणही करतात!
त्यामुळे त्यांचा निर्णय सहसा चुकत नाही! महत्वाचं म्हणजे त्यांच्या स्वभावामध्ये- मनामध्ये आणि तसेच विचारांमध्ये असलेला विवेक हा अशाच डोळस माणसासारखा सतत जागरूक असतो! जेणेकरून योग्य निर्णय त्यांना घेण्यात कधीच कठीण वाटत नाही! मित्रांनो- अशी कल्पना करा की डोळे बंद करुन आपण एका आरशासमोर उभे आहोत.
त्यावेळी आपल्याला काही दिसत नाही तसंच जर आपल्यात असलेला विवेक आपण बाजूला ठेवून काही पाहण्याचा प्रयत्न केला तर योग्य ते दर्शन त्या गोष्टीच आपल्याला निश्चितच होणार नाही म्हणून विवेक हा एका अर्थी आपल्या दृष्टी सारखा असतो! म्हणूनच आपला विवेक जागृत असेल तर आपण योग्य तो निर्णय घेऊ शकतो!
म्हणूनच विवेक हा कोणत्याही क्षेत्रात अत्यंत आवश्यक आहेच म्हणून मित्रांनो आपल्यावर कोणताही प्रसंग आला तरी आपण विवेक सोडता कामा नये! म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात- मी अविवेकाची काजळी फेडूनि विवेकदीप उजळी! तो योगिया पाहे- दिवाळी निरंतर!! असा विवेकशील माणूस त्याच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा दिवाळी म्हणूनच साजरा करतो.
त्याच्या चेहर्यावर विलक्षण असं प्रसन्न हास्य विलसत असतं हेच खरं त्याच्या हसऱ्या व्यक्तिमत्त्वाचं रहस्य आहे! आणि हाच आपल्या आजच्या चिंतनाचा विषय होता तो निश्चितच आपल्या पर्यंत पोहोचला आहे म्हणून मी इथेच थांबतो!
(शब्दांकन – ला. डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार



