अहिल्याबाई होळकर संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संस्थांना सीएसआर चे धडे
संस्थांचे जाळे निर्माण करणार –  संदीप कुमार नाचन
लोणावळा (श्रावणी कामत):
  येथील अहिल्याबाई होळकर संस्था ही सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये विविध भागांमध्ये काम करणाऱ्या संस्थांना घेऊन सीएसआर चे माध्यमातून काम करणार आहे. ही संस्था पुढील वर्ष दोन वर्षांमध्ये सुमारे 300 संस्थांचा मोठा जाळ महाराष्ट्रभर निर्माण करून समाज उपयोगी कामे करणार आहे. असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्री संदीप कुमार नाचन यांनी केले आहे.
 
    कोरोना कालावधीमध्ये सर्व व्यवस्था कोलमडू पडली होती. त्याचा परिणाम सर्व सामाजिक संस्थांवरही झालेला दिसून येतो. यासाठी संस्थांना पुन्हा उभे करण्यासाठी व त्यांच्याकडून समाज उपयोगी कामे करून घेण्यासाठी, विकासात्मक कामे करून घेण्यासाठी अहिल्याबाई होळकर संस्था लोणावळा यांनी पुढाकार घेतला आहे.
   
त्यांनी या संस्थांना सीएसआर बाबत मार्गदर्शन करणे आणि त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे करणे यासाठी संस्थांना प्रशिक्षण देण्याचे सत्र सुरू केले आहे. दिनांक 6 मे रोजी आणि दिनांक 21 मे रोजी या संस्थेने महाराष्ट्रातल्या विविध संस्थांसाठी प्रशिक्षण सत्र ठेवले होते. तसेच उर्वरित इच्छुक संस्थांसाठी दिनांक 28 मे रोजी शेवटचे  प्रशिक्षण सत्राचे आयोजन केले आहे.

यामध्ये संस्थांनी कशाप्रकारे काम केले पाहिजे, संघटीत होऊन आपण कोणते कोणते कामे करू शकतो, किती चांगल्या पद्धतीने कामे करू शकतो, अगदी गाव पातळीवर जाऊनही आपल्याला किती कामे करता येऊ शकतात. यावर अहिल्याबाई होळकर संस्था अध्यक्ष श्री संदीप कुमार नाचन यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये सुमारे 84 संस्थांनी सहभाग नोंदवला आहे व त्यांना योग्य कामाची दिशा मिळाली आहे.

त्यांच्या माध्यमातून खूप चांगले काम महाराष्ट्रभर उभे राहणार आहे. यामध्ये बुलढाणा, अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, रत्नागिरी, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड अशा विविध जिल्ह्यातून संस्थांनी प्रशिक्षण घेतले आहे. तसेच लिंकेज झालेल्या आहेत.

या कामी श्रावस्ती बहुउद्देशी विकास प्रबोधिनी बुलढाणा चे अध्यक्ष संदीप सुखधान, आम्ही सावित्रीच्या लेकी मुंबईचे सुनील भोसले , ओमकार महिला विकास प्रतिष्ठान सातारा च्या सुनीता पाटणे यांनी पुढाकार घेऊन परिश्रम घेतले आहेत.

error: Content is protected !!