जया अंगी मोठेपण- तया यातना कठीण!
होय मित्रांनो,
मिठाशिवाय भोजन बेचव आणि आळणी वाटतं- तसंच संकटांशिवाय- संघर्षाशिवाय जीवन हे सुद्धा आपल्याला बेचव वाटल्याशिवाय राहणार नाही! म्हणूनच जीवनात जर खरा आनंद प्राप्त करायचा असेल-जीवन रसरशीत समृद्ध आणि संपन्न व्हाव असं वाटायचं असेल तर–संकट यायलाच हवीत!
म्हणून अशावेळी खचून न जाता त्या संकटांचं आपण स्वागतच केलं पाहिजे कारण– मित्रांनो हाच आपल्या आत्मपरीक्षणाचा आणि परीक्षेचा काळ असतो! जीवन प्रवासात संकटे आल्यामुळे अकारण आपण घाबरून तर मुळीच जाऊ नये!
उलट याचा उपयोग नवीन काहीतरी शिकण्यासाठी करून घ्यावा! अशीच आपली या संघर्षमय जीवनाकडे बघण्याची भूमिका असावी! परमेश्वराने आपली कसोटी बघण्यासाठी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे असाच सकारात्मक विचार या काळात आपण करावा!
कारण आयुष्यात संकट आलं नाही? अशी एकही व्यक्ती आपल्याला शोधूनही सापडणार नाही! म्हणूनच मित्रांनो — आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या-त्या पातळीवर संकटावर मात करूनच यशस्वी झालेली आहे!
दोस्तो– मूर्ती पूजनीय है कि उसमे देवता है– अ पितू–उसने तरासे जाने का दर्द सहा है! याचाच अर्थ असा की मित्रांनो- टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण कधीच येत नसतं! यासाठी आपण अशाच व्यक्तीचा आदर्श घेतला पाहिजे की ज्या व्यक्ती संकटातून यशस्वीपणे बाहेर पडलेल्या आहेत.
त्यांच्याशी आपण वेळोवेळी बोललं पाहिजे! त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत! त्यातूनच आपल्या क्षमतेची आपल्याला जाणीव खऱ्या अर्थाने होत असते! कारण आयुष्याच्या प्रवासात संकट टळणार नाही ही गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आहे!
संकटासारखा अनुभव देणारा कुठलाच गुरु नाही! नुकत्याच कोरोना सारख्या संकटांमुळे आपल्याला खरी नाती समजलीत! त्याग आणि समर्पणाची ओळख आपल्याला झाली! विविध क्षेत्रात शोध लागलेत! आपल्या शक्तीप्रमाणे त्या त्या संकटांना सामोरं जात असताना आपल्यात सामावलेला पुरुषार्थ आपल्याला कळला!
मित्रांनो हाच विचार आपण घेऊन येथेच थांबतो आहोत! पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की– गेल्या तीन वर्षांपूर्वी कोरोनाव्हायरस या संकटाला समर्थपणे तोंड देण्यासाठी वैयक्तिक सामाजिक राजकीय आणि शासकीय पातळीवर समर्थपणे तोंड देण्यात आपण सर्वजण यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज हा विचार आपल्या समोर मांडून मी येथेच थांबतो आहे!( शब्दांकन – ला.डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- इंदोरीच्या चैतन्य इंटरनॅशनल स्कूलची विज्ञान आश्रमात शैक्षणिक सहल
- शिरगावात दहा फुटी अजगराला जीवदान:वन्यजीव रक्षक संस्थेचा पुढाकार
- टाटा उद्योगसमूह राष्ट्रप्रेमी: पद्मश्री पोपटराव पवार
- माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा :रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन शाळेत भरला पुन्हा वर्ग
- नाणोली तर्फे चाकण येथे रक्तदान शिबीराचे आयोजन