निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराचा सांगता समारंभ
कान्हे:
*मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ आयोजित निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीराचा सांगता समारंभ श्री साईबाबा सेवाधाम, कान्हे फाटा येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला.
*
यावेळी कात्रज दूध संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब नेवाळे, ह.भ.प. वैराग्यमुर्ती शंकर महाराज मराठे, देवराई संस्थेचे अध्यक्ष श्री. सुकनशेठ बाफना, ह.भ.प. मुरारीलालजी शर्मा( स्वामीजी), ह.भ.प. सुभाष महाराज पडवळ, पवन मावळ दिंडी समाजाचे उपाध्यक्ष ह.भ.प. भागुजी महाराज ठोंबरे, भरतशेठ येवले इत्यादी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.

       मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी निवासी बालवारकरी आध्यात्मिक संस्कार शिबीर राबवत असून याही वर्षी दिनांक 6 मे ते 21 मे या 16 दिवसांच्या कालावधीत या शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात 60 हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

या शिबीरासाठी ह.भ.प. दत्तात्रय महाराज हजारे, ह.भ.प. सोमनाथ सातपुते, स्वामी अशोकानंद महाराज या शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. या निवासी शिबीरात विद्यार्थ्यांना योगासने व ध्यानधारणा, अभंग व श्लोक, गीतापाठ, टाळ व मृदंगवादन, मैदानी खेळ, देव देश धर्म, संतांचे चरित्र, हरिपाठ इत्यादी गोष्टींची शिकवण देण्यात आली.

       दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे विश्वस्त, मावळ तालुक्यातील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. नाथा महाराज शेलार यांची किर्तनरूपी सेवा झाली. तद्नंतर मान्यवरांचा व विद्यार्थांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण झाले व विद्यार्थांना प्रशस्तीपत्र आणि बक्षिस वाटप करण्यात आले.

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंडळ राबवत असलेला हा उपक्रम आदर्श असून त्यातून नवीन आदर्श पिढी घडेल असे म्हणत मंडळ करत असलेल्या कार्याचे कौतुक उपस्थित सर्वच मान्यवरांनी केले व मंडळाच्या कार्याला शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त केल्या.

       मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार भसे यांनी आपल्या भाषणामध्ये मंडळ राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली व बालवारकरी संस्कार शिबीराचे महत्व पटवून दिले.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ह.भ.प. रामदास पडवळ यांनी केले. आभार मंडळाचे कोषाध्यक्ष ह.भ.प. बजरंग घारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष दिलीप वावरे यांनी केले. ह.भ.प. शंकर महाराज मराठे यांनी पसायदान घेवून त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

        हे निवासी शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष ह.भ.प. संतोषजी कुंभार, संघटक सुनिल महाराज वरघडे, शांताराम गायखे, शिवाजीआण्णा पवार, दिपक वारिंगे, बळवंत येवले, सहसचिव नितीन आडिवळे सर, कायदेशीर सल्लागार अँड सागर शेटे, अध्यक्ष रोहिदास जगदाळे, बाळासाहेब राजिवडे, गोविंद सावले, साईनाथ राऊत, बाळासाहेब देशमुख, दशरथ सावंत, विभाग प्रमुख निलेश शेटे, पंढरीनाथ वायकर, विनायक कल्हाटकर, सुखदेव गवारी, राजाराम असवले, देवराम सातकर, रोहिदास घारे, संजय बांदल, दत्ता ठाकर, रवि ठाकर, पत्रकार मच्छिंद्र मांडेकर, बंडू कदम, बाळासाहेब वारिंगे, भिवाजी गायखे, युवराज देवकर, सदाशिव पेठकर, किसन मावकर, राजाराम विकारी, रोहिदास खांडेभराड, मारूती देवकर, श्रीमती सुवर्णाताई कुटे, अमोल भेगडे यांसह अनेकांनी विशेष प्रयत्न केले.

error: Content is protected !!