शोधीशी मानवा राउळी देऊळी….नांदतो आनंद हा तुझ्या अंतरी!
मित्रांनो,
लोक तुमची निंदा करतात तेव्हा तुम्ही दुःखी होता पण– तेच लोक जेव्हा तुमची स्तुती करतात ,तेव्हा तुम्ही सुखी आणि आनंदीत होता! म्हणजेच तुमच्या सुखदुःखाच बटण लोकांच्या हातात आहे.

वास्तविक आपला प्रयत्न असा असला पाहिजे की हे- सुखाच बटन प्रत्यक्ष आपल्याच हाती असायला हवं! आणि मित्रांनो ही कला संकटात सुद्धा हसणाऱ्या  व्यक्तींना साधलेली आहे!कारण ते त्यांच्यावर कितीही संकटे आलीत तरी ते सतत हसत  असतात.

एवढेच नव्हे तर अशा हसणाऱ्या लोकांची संगत एखाद्या  अत्तरासारखी असते, कारण   आपण अत्तर जरी विकत घेतलं नाही तरी परमेश्वराने आपल्याच ओंजळीत टाकलेल्या आपल्या आयुष्यातील सुगंधित आणि प्रसन्नतेची अनुभूती केवळ त्यांच्या सहवासाने आपण अनुभवू शकतो!

म्हणूनच मित्रांनो –जो मानव आयुष्याच्या अंतिम सुखाच्या आणि आनंदाच्या शोधात  निघालेला आहे त्याचं हे उद्दिष्ट त्याला वरील दोन गोष्टींनी प्राप्त करता येत- ते म्हणजे स्वतः आपण आपल्यातच आनंदाचा शोध घेणे  आणि संकटातही हसत राहणाऱ्या व्यक्तींच्या सतत सहवासात असणे .

हा संदेश मित्रांनो आज आपल्या हृदयापर्यंत पोहोचला आहे म्हणून येथेच थांबतो!
(शब्दांकन- ला.डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!