वडगाव मावळ : अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि.19) सकाळी 11:15 वा. पूर्वी कान्हे रेल्वे स्टेशन जवळ ता. मावळ जि. पुणे. येथे घडली. आरोपींना लवकरच अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.ओमकार भागुजी काटकर (वय १९, रा. पारवडी ता मावळ) याने वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
भागुजी बाबुराव काटकर (वय ५४ , रा. पारवडी ता. मावळ जि. पुणे) खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात आरोपीने कोणत्यातरी अज्ञात कारणावरून मयत भागुजी बाबुराव काटकर यांच्या डावे कानाचे वर डोक्यात कपाळावर डावे भुवईवर, दोन्ही डोळ्याचे मध्ये नाकाचे वर व उजवे बाजुस दगडाने मारहाण करून जिवे ठार मारले आहे.
घटनास्थळी लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक, पोलीस निरीक्षक विलास भोसले व पोलीस अंमलदारांनी भेट दिली.मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
मयत हा महिंद्रा कंपनीत रात्रपाळी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्यांची दुचाकी व मोबाईल गायब आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास भोसले करत आहेत. लवकरच खुनातील आरोपींना अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
- मोरया प्रतिष्ठानच्य पतंग महोत्सवाला वडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- ‘ परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नवलाख उंबरे शाळेचे यश
- दानशूर व्यक्तीमत्व हरपले, उद्योजक सी.एम.शहा यांचे निधन
- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने वकृत्व व निबंध स्पर्धा