वडगाव मावळ:
वडगाव नगरपंचायत वतीने पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे – नाले साफसफाई कामास सुरुवात झाली.
येत्या जून महिन्यात मान्सूनचे आगमन होणार असून काही दिवसांतच पावसाळा सुरू होणार असल्याने वडगाव नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रातील सर्व ओढे-नाले साफसफाईच्या सर्व कामांना दरवर्षी प्रमाणे पावसाळ्यापूर्वी सुरुवात करण्यात आली असता यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी नाले साफसफाई कामांची पाहणी केली.
तसेच वडगाव नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील काही उघडी गटारे साफ करणे, कचरा व्यवस्थापन तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत काढण्यासंदर्भात नगरपंचायत मधील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर, मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी सूचना दिल्या आहेत.
शहरातील कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होऊ नये. यासाठी मुख्य बाजारपेठेसह व अन्य भागात रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविण्यात येणार असून जेणेकरुन कोणताही अपघात किंवा समस्या उद्भभवणार नाहीत.
याशिवाय महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी नादुरुस्त असलेल्या विद्युत वाहिन्या त्वरीत दुरुस्त करण्यासंदर्भात महावितरण विभागाला नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी निवेदन दिले असून येत्या दोनच दिवसांत वीज वितरण कंपनीने संबंधित कामांना सुरुवात करणार असल्याचे कळविले आहे.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष