
आळंदी:
आळंदीत माऊलीच्या नगरीत प्रथमच- दृष्टिहीन बांधवांचे ज्ञानेश्वरी पारायण संपन्न झाले.
दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया नाशिक व ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय पारायण झाले. दृष्टिहीन बांधवांनी ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा याच देहि याची डोळा अनुभवला.
हे आगळे वेगळे ज्ञानेश्वरी पारायण करण्याचा संकल्प काही दिवसापूर्वी या संस्थांनी सोडला होता.या अविस्मरणीय समारंभाचे उद्घघाटन अत्यंत दिमागदार पद्धतीने तळेगावचे सुप्रसिद्ध लेखक वक्ते डॉक्टर शाळीग्राम भंडारी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून संपन्न झाले.
यावेळी ज्येष्ठ लायन नंदकुमार काळोखे, लायन दीपक बाळसराफ लायन अनिता बाळ सराफ -डॉक्टर सौ दिपाली झवर उपस्थित होते.या आगळ्यावेगळ्या समारंभास तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर सौ दिपाली भंडारी- झवर यांनी रुपये ,लायन मकरंद बापट यांनी ,रोटेरियन दादासाहेब हुरे यांनी या सर्वांनी ब्रेल लिपी ज्ञानेश्वरीसाठी अर्थ सहाय्य केले.
- ध्येय साध्य करण्यासाठी जीवापाड मेहनत करा : सहाय्यक विभागीय अधिकारी गायकवाड
- गावपातळीवर दिव्यांग सर्वेक्षण सुरू
- बालनाट्य स्पर्धेत जैन इंग्लिश स्कूल व आदर्श विद्या मंदिर प्रथम
- मोरया प्रतिष्ठानच्या वतीने वडगाव शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्यायेण्यासाठी बसेसची मोफत सेवा सुरू
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास सेवा,उपक्रमाचे नववे वर्ष : आमदार सुनिल शेळके यांचा पुढाकार



