दृष्टिकोन बदला- सारं आयुष्य बदलेल! होय मित्रांनो, देश-विदेशातील अनेक शास्त्रज्ञांनी अभ्यासपूर्ण असं अनुमान काढलं आहे की– जर आपल्याला दुःखीकष्टी चेहरा बदलून त्यावर हास्य निर्माण करायचं असेल तर निश्चितपणे आपल्या मेंदूला चांगल्या सूचना दिल्या गेल्या पाहिजेत. कारण संघर्षाच्या संकटाच्या वेळी नकारात्मक निराशाजनक नराश्य निर्माण होणाऱ्या लहरी नैसर्गिक रित्या आपल्या मेंदूत तयार होतात.त्यावेळी जाणीवपूर्वक चेहऱ्याची ठेवण आपल्याला बदलली पाहिजे. ती सकारात्मक विचारांशी जोडली गेली पाहिजे!कारण त्यामुळेच आपला मेंदू चेतना पेशींना त्यानुसार संदेश देत राहील आणि त्याचा परिणाम असा होईल की नैराश्याचं वातावरणच आपोआप नाहीसं झालेल आपल्याला दिसेल. त्याची जागा सकारात्मक भावनेने आपोआप घेतली जाईल. आणि हो मित्रांनो हे सर्व प्रत्यक्ष कृतीत आणणारी अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात! त्यासाठी फक्त एकच सोपा सरळ उपाय आहे की _-आपल्या आयुष्यातील ज्या काही चांगल्या घटना असतील! चांगले क्षण असतील- ते फक्त आणि फक्त डोळ्यासमोर आणायचे आहेत! संपूर्ण आपलं अंतकरण या आनंदी क्षणांनी भरभरून टाकायच आहे! त्यामुळे दुखी कष्टी अशा क्षणांना आपल्या अंतकरणात सुईच्या टोकाएवढी सुद्धा जागा शिल्लक राहणार नाही! मित्रांनो अशी जीवनशैली जगणारी माणसं ज्यावेळी आपल्याला भेटत राहतील त्यावेळी आपल्या वागण्यात बोलण्यात निश्चितच परिवर्तन होणार आहे! कारण – ही माणसं त्यावेळी हास्याचे कारंजे फुलताना उडवताना आपल्याला जागोजागी भेटतील एवढेच नव्हे तर ही माणसं एकमेकांत स्नेहभाव निर्माण करताना दिसतील! त्यांच्या सहवासात आल्यानंतर आपल्यात असलेला कडवटपणा आपल्यातून कधी निघून गेला हे आपल्यालाही कळणार नाही! म्हणून नैसर्गिक हास्य निर्माण करणे ही कला जर आपल्याला साधली तर आपलं संपूर्ण जीवनच बदलून जाईल हे शास्त्रज्ञांचं ठाम मत आहे! आज आपल्याला असाच एक संकल्प सोडायचा आहे की मी जगात केवळ जगण्यासाठी नाही तर जग जिंकण्यासाठी आलेलो आहे! मला वाटतं आजचा विषय आपल्या पर्यंत पोहोचलेला आहे म्हणून मी इथेच थांबतो धन्यवाद! (शब्दांकन- ला. डॉ.शाळीग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष