सोमाटणे:
आढले बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष पदी डोणे येथील नामदेवराव घारे यांची तर उपाध्यक्ष पदी नाथाभाऊ सावळे यांची निवड झाली.
अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली.त्यांच्या निवडीचे अभिनंदन होत आहे.
नामदेवराव घारे हे पवनमावळातील राष्ट्रवादी काँग्रेस चे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते आहे.यांच्या अध्यक्ष पदी निवडीने परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवण्याचे काम त्यांनी केले असून आगामी काळात संस्थेच्या हितासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष घारे व उपाध्यक्ष सावळे यांनी सांगितले.
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष