कामशेत:
सांगिसे ता.मावळ येथील  श्री कांबेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येणार आहे,या  उत्सवात पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्टच्या संस्थापिका कांचनबेन कांतीलाल मुथा व संस्थापक अध्यक्ष डाॅ. विकेश मुथा यांनी केले.

गुरुवार दि. १६/०२/२०२३ ते रविवार दि. १९/०२/२०२३ रोजी हा महोत्सव आयोजित केला आहे .या दरम्यान अनुक्रमे हरिपाठ, प्रवचन ,किर्तन, हरिजागर आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. ह .भ.प. पांडुरंग महाराज गायकवाड (कांब्रे ना.मा.),ह.भ.प. शाम महाराज फाळके (सडवली) ,ह.भ.प. दत्ता महाराज शिंदे (बऊर), ह.भ.प. सुखदेव महाराज ठाकर (नागाथली),ह.भ.प. भिमाजी महाराज भानुसघरे (शिलाटणे)
ह.भ.प. निकीताताई महाराज भांगरे (आळंदी) यांची प्रवचने व किर्तन होणार आहे.

रविवार दि. १९/०२/२०१२ रोजी स. ९ ते ११ वा. ह. भ. प. दिलीप महाराज खेंगरे (भाजे) यांचे काल्याचे कीर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.पाथरगाव, मुंढावरे, बुधवडी, सांगिसे, नेसावे, खांडशी, खडकाळे, शिलाटणे, कोळवाडी, दळक, वेळवली, उंबरवाडी या गावचे हरिजागर होतील.

| महावीर हॉस्पिटल, महावीर इलेक्ट्रॉनिक्स, महावीर मेडीकल कार्यक्रमाचे आयोजक असून  श्री कांवेश्वर महादेव मंदिर, सांगिसे कार्यक्रमांसाठी परिश्रम घेत आहे.

error: Content is protected !!