तळेगाव स्टेशन:
हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षी हिंद विजय पतसंस्थेने सर्व पतसंस्थेचे अहवाल मागवून व सर्वेक्षण करून हिंदवी जय सहकार पुरस्कार जाहीर केले. यात धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था व भरत अग्रवाल नागरी सहकारी पतसंस्थेचा हिंद विजय सहकार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

हा गौरव पतसंस्थेचा कारभार व कमी एनपीए साठी देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दत्ता भेगडे (उपाध्यक्ष राजगुरुनगर सहकारी बँक) तर प्रमुख पाहुणे गुलाबराव वाघोले (उपाध्यक्ष जय हिंद सहकारी बँक),ॲड .रवींद्र दाभाडे ,सुधाकर देशमुख होते. डॉ. प्रमोद बोराडे यांनी अपरिचित मावळ या विषयावर व्याख्यान दिले.

  यावेळी लता भरत अग्रवाल ,सुनंदा दत्तात्रय दाबणे, संजय गायकवाड, राजू दळवी ,रामविलास खंडेलवाल, मिलिंद खळतकर ,यशवंत पायगुडे ,अरविंद कुलकर्णी, सुरेश गायकवाड, ऋषिकेश लेंडघर ,खंडूजी टकले ,विजय शेटे, विनोद टकले, संतोष परदेशी , अँड.  तुकाराम काटे, संजय शिंदे ,अमर खळदे ,मयूर वाघोले, मयूर पिंगळे ,आदित्य टकले उपस्थित होते.

प्रास्ताविक कैलास भेगडे यांनी केले .सूत्रसंचालन प्रदीप गटे यांनी केले .यावेळी पुरस्कार दिल्याबद्दल विजय शेटे यांनी हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे आभार मानले.

You missed

error: Content is protected !!