श्री डोळसनाथ नागरी पतसंस्थेचे प्रशिक्षण शिबीर संपन्न
तळेगाव दाभाडे:
स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यवसायात आपलं ज्ञान अद्ययावत असल्याशिवाय आपण यश गाठू शकत नाही.हे लक्षात घेऊनच- डोळसनाथ पतसंस्थेचे संस्थापक आणि मार्गदर्शक बबनराव भेगडे तसेच संस्थेचे अध्यक्ष संतोष भेगडे यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर येथे डोळसनाथ पतसंस्थेची कार्यशाळा संपन्न झाली.

सर्व संचालक व कर्मचारी व पिग्मी एजंट या सर्वांना नवीन येणाऱ्या कायद्याचा परिचय व्हावा,तसेच संस्थेच्या मार्केटिंग बाबत पुढील ध्येय धोरण आणि दिशा निश्चितीबाबत बँकिंग क्षेत्रातील ज्ञान- अनुभव संपन्न अशा  व्याख्यात्यांचं मार्गदर्शन व्हावं हा उद्देश होता.

पीपल को बँकेचे मा महाव्यवस्थापक  सदानंद दीक्षित,अलिबाग येथील आदर्श पतसंस्थेचे  चेअरमन  अभिजीत पाटील,संस्थेचे सल्लागार डॉ. शाळिग्राम भंडारी, महेश  शहा ,व्याख्याते सुनील शेटे या सर्वांनी आपल्या व्याख्यानातून मार्गदर्शन केले.

संस्थेचे सर्व संचालक, व्यवस्थापक, कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांनीही प्रत्येक विषयातील चर्चेत सहभाग घेतला. महेश शहा, संजय ओसवाल,  राहुल पारगे- उपाध्यक्ष निलेश राक्षे- विकास कंद, सचिव अतुल राऊत,कौस्तुभ भेगडे, तसलीम शिकीलकर,अतुल काकडे उपस्थित होते.

error: Content is protected !!