वडगाव मावळ:
महाराष्ट्रातील सर्वाधिक गुलाब  फुल उत्पादक तालुका अशी  मावळ तालुक्याची ओळख आहे,व्हॅलेंटाईन डे ला जगभरात मावळातील गुलाबाचा सुगंध दरवळतो. या मावळातील शेतक-यांनी जरबेरा, कारनेशन,शेवंती, जिफासोफिला अशी फुले आणि भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली आहे.

गुलाबांच्या फुलांना देशासह परदेशातही मोठया प्रमाणात मागणी असल्याने ही फुले निर्यात होत  आहे.व्हॅलेंटानडेच्या काळात लाल गुलाब फुलांना मोठयाप्रमाणात मागणी असते जपान,इंग्लड,फ्रान्स,हॅालंड ,ऑस्ट्रेलिया, दुबई श्रीलका,होलंड,केनिया व इथोपिया या देशात मागणी होते. 26 जानेवारी ते 10 फेबु्वारी या काळात गुलाब फुल परदेशात निर्यात केली जातात .

प्रति 40 ते 60 सेटीमिटर फुलास 15 ते 20 रूपये पर्यत भाव मिळत आसतो. हि निर्यातक्षम फुले उत्पादनासाठी शेतकरी दोन महिने आगोदरच तयारी सुरू करत आसतात. 1 ते 10 डिसेंबरच्या कालावधीमध्ये झाडांची कटींग व बेंडीग केली जाते.

फूल झाडांना चांगल्या प्रतीची खते दिली जातात कोणत्याही प्रकारच्या रोगराईला बळी पडू नये म्हणून विविध औषधांची फवारणी केली जाते, त्यांची प्रत व दर्जा चांगला ठेवला जातो, यासाठी आधिक कामगार कामासाठी लावले जातात. तर 28 जानेवारी ते 10 फेब्रवारी या काळात फुले विक्रीसाठी तयार केली जातात. त्यासाठी  विशेष काळजी घेतली जाते या काळात प्रती एकरी 60 ते 70 हजार निर्यात क्षम फुले उत्पादन घेतले जाते  .

व्हॅलेंटानसाठी लाल फुलांनाच जास्त  मागणी आसते. निर्यातक्षम फुलांची सकाळी 7 ते 9 या वेळेत त्यांची कापणी ( हारवेस्टींग) केली जाते, त्या फुलांची दांडीचा डेलिफिंग मशीनने काही पाने पाडली जातात नंतर ही फुले शीतगृहात ठेवली जातात व ती सेंटीमिटर नुसार निवडली जातात पुन्हा यातुन  A ग्रेड  फुलाची निवड केली जात असल्याचे पराग सावंत फूल उत्पादक शेतकरी यांनी सांगितले.

देशासह परदेशात देखील फुल विक्री करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.तसेच लग्न सराई असल्यामुळे स्थानिक बाजरपेठेत गुलाबाला चागल्या प्रकारे मागणी वाढू लागली आहे. मात्र जीएसटी वाहतुकीचा खर्च परवडत नाही वाहतुकीवरील जीएसटी सरकारने आकारू नये अशी मागणी
भारत आडिवळे फूल उत्पादक शेतकरी यांनी केली.

पॉलीहाऊस मधून गुलाबफुले काढल्यानंतर ती कोल्ड स्टोरेज मध्ये 2 डिग्री तापमानात ठेवली जातात. तदनंतर फॅक्टरी मध्ये 15 डिग्री तापमानात त्याच्यावर काम करत पुन्हा 2 डिग्री तापमानात ठेवले जातात. तेथून ती विक्रीसाठी वातानुकूलित वातावरणात पाठवली जातात. शेती ते ग्राहक हा प्रवास करताना गुलाब फुलांची विशेष काळजी घेतली जाते. मात्र विमानतळ व प्रवासात ती फुले योग्य प्रकारे राहण्यासाठी विमानतळावर गुलाब फुलांसाठी कोल्ड स्टोरेज तयार करण्याची मागणी फुल उत्पादकांनी केली असल्याचे बुधाजी जागेश्वर फूल उत्पादक शेतकरी यांनी सांगितले.

केनिया व इथोपिया मधून शेतीमाल निर्यातीसाठी विमान प्रवासात सवलत मिळत असल्याने त्या भागातून परदेशात माल विक्री भारतापेक्षा जास्त होत आहे. आपल्याकडे प्रवासात सवलत नाही व 18 % gst लावल्याने मागणी असून देखील फुले एक्सपोर्ट करताना अडचणी येऊ लागल्या आहेत असे श्रीराम हाय टीच फार्मस ग्रुप फूल उत्पादक पवळेवाडी या टीमने सांगितले.

error: Content is protected !!