तळेगाव स्टेशन:
स्वतःसाठी,समाजासाठी आणि देशाला पुढे घेऊन जाणारा विद्यार्थी घडवणे हे आमचे ध्येये आहे,यासाठी व्याख्यानमालेचा उपक्रम असल्याचे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी स्पष्ट केले. इंद्रायणी विद्या मंदीर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयात मावळ भूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेत काकडे बोलत होते.

या व्याख्यानमालेचे उद्घाटन  सुप्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील , इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे ,कार्यवाह चंद्रकांत शेटे, विश्वस्त शैलेश शहा,विश्वस्त गणेश खांडगे, उद्योजक विलास काळोखे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलनाने व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार कृष्णराव भेगडे साहेब  या सोहळ्यास उपस्थित होते.

यावेळी संदीप काकाडे, रणजित काकडे, संजय साने, राजेश म्हस्के,राजश्री म्हस्के, सुरेश धोत्रे,नंदकुमार शेलार,गणेश भेगडे,सत्यशीलराजे दाभाडे सरकार ,शंकरराव शेलार,ज्ञानेश्वर दाभाडे,शाळिग्राम भंडारी,वृषालीराजे दाभाडे सरकार,शामराव दाभाडे,प्रभाकर ओव्हाळ,संजय वाडेकर,वसंत पवार,वैशाली दाभाडे, संभाजी मलघे, सुरेश  धोत्रे, यांच्यासह विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अण्णासाहेब दाभाडे यांना सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य संभाजी मलघे यांनी व्याख्याते विश्वास पाटील यांचा परिचय करून दिला.
रामदास काकडे म्हणाले,” ४४ विद्यार्थ्यावर हे महाविद्यालय सुरू झाले. आज ६५०० विद्यार्थी शिकतात. जागतिक पातळीवरील सुवर्णपदक मिळवून देणारे हे महाविद्यालय आहे. सामाजिक दायित्व जपणा-या महाविद्यालय सर्व शाखांचे शिक्षण दिले जाते.सर्वाना एकसंध ठेवून काम करणा-या कृष्णराव भेगडे साहेब याच्या विचारांचा आम्ही पाठराखण करतो. सहिष्णुता जपणा-या साहेबांचे विचार तरूण पिढीकडे जाण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.

उद्योजक किरण काकडे, उद्योजक संदीप काळोखे,अर्किटेक्ट  सुधीर पाटील, उद्योजक विलास काळोखे, उद्योजक राजेश  म्हस्के, उद्योजक संजय साने ,उद्योजक  रणजित काकडे , शैलेश शहा, अँड. धनंजय काटे, निरुमा कानिटकर,

  उद्धव कानडे व संदीप  भोसले यांनी सुत्रसंचालन केले. निरुपमा कानिटकर यांनी आभार मानले.

error: Content is protected !!