संत परंपरा जोपासणे आनंदी जीवनाचे साधन -डॉ.भावार्थ महाराज देखणे
तळेगाव दाभाडे:
येथील हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आणि रोहित रविंद्रनाथ  दाभाडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अॕड.विश्वनाथराव दाभाडे स्मृती व्याख्यान मालेत  संत साहित्याचे अभ्यासक डॉ.भावार्थ महाराज देखणे  यांचे आनंदी जीवन या विषयावर व्याख्यान झाले.

यावेळी त्यांनी सांगितले की संत परंपरा जोपासणे आनंदी जीवनाचे साधण आहे.देहु,आळंदी संतपरंपरेची सावली आहे.वारा वाहताना ढग गोळा होतात आणि पाऊस पडतो तसे श्रोत्यांचा वारा वाहलातर व्याख्यानमाला दर्जेदार होवून व्याख्यानाचा पाऊस पडेल.सध्या समाजात दुःख,दुर्लक्ष,मृत्यू असे तीन प्रश्न आहेत या प्रश्नांना सामोरे गेले तर ख-या अर्थाने आनंदी जीवन होईल.

डोळ्यांनी चांगले तेच पाहीले पाहीजे विवेक नसेल तर ज्ञानाचा फायदा नाही.मृत्यूची चिंता करु नका आजचा दिवस शेवटचा आहे असे समजून वागा.जीवनात प्रयोजन बदलतात कर्माची कला शिकून आनंद भोगण्याची कला अवगत केलीतर आनंदी जीवन होईल असेही  देखणे यांनी सांगितले. भगवतगीतेतील दृष्टांतासह  अनेक उदाहरणे देवून आनंदी जीवन कसे जगावे हे त्यांनी सविस्तर सांगितले.यावेळी सुधाकर देशमुख, सुरेश धोत्रे,उमाकांत कुलकर्णी,कैलास भेगडे,कृष्णराव पुरंदरे,अनिल वेदपाठक,महादेव वर्तले उपस्थित होते.

प्रास्ताविक हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॕड.रविंद्रनाथ दाभाडे यांनी केले यावेळी पतसंस्थेच्या प्रगतीची माहिती त्यांनी  दिली.कृष्णराव पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त केले.अध्यक्षस्थानी ओंकार वर्तले होते अध्यक्षीय भाषणात तरुण वर्ग व्याख्यानास प्रतिसाद देत नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केला.कैलास भेगडे यांनी सुत्रसंचालन केले.आभार प्रदीप गटे यांनी मानले.

You missed

error: Content is protected !!