कामशेत:
उकसान ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी आशा विलास  बांदल यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सरपंच श्यामल अनिल इंगवले यांनी वेळेत राजीनामा दिल्या मुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली.

मंडल अधिकारी माणिक साबळे  यांच्याअध्यक्षतेखाली ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी आशा विलास बांदल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध सरपंच म्हणून घोषणा करण्यात आली.

यावेळी उपसरपंच अमोल शिंदे,सारिका कोंढरे -माजी सरपंच वि सदस्य ,श्यामल इंगवले-माजी सरपंच,सदस्य ,सीताबाई शिंदे-सदस्य ,आशा मोरमारे-सदस्य उपस्थित होते.बांदल यांची निवड जाहीर होताच समर्थकांनी भंडारा गुलालाची उधळण केली. माजी उपसरपंच सोमनाथ शिंदे, पोलीस पाटील सुषमा शिंदे, माजी उपसरपंच रोहिदास असवले, तुकाराम कोद्रे,  रोहिदास जांभुळकर, आतिश मोरे,  बबन  कोंढरे, मारुती खांडभोर, सविता शेवाळे,  सुकेशनी पेठकर, नामदेव जाधव, रामदास आलम यांच्या उपस्थित नवनिर्वाचित सरपंच बांदल यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!