टाकवे बुद्रुक :
आंदर मावळ मधील मानकुली येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने काल्याचे किर्तन ह भ प शांताराम बाबा माहाराज जाधव कीर्तनकार जुन्नर यांची  किर्तन रुपी सेवा आयोजित करण्यात आली होती. त्या निमित्ताने टाकवे गावचे माजी उपसरपंच व टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास राघुजी असवले  यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यानच्या काळात तेथील ग्रामस्थांनी मागील काही महिन्यापूर्वी मंदिरासाठी लागणाऱ्या विटाची मागणी केली असता माजी उपसरपंच रोहिदास असवले यांनी मंदिरासाठी वीट सुपूर्त केली.त्यानिमित्ताने मानकुली येथील ग्रामस्थांच्या वतीने  माजी  उपसरपंच रोहिदास असवले यांचा सत्कार करण्यात आला.

मानकुली येथील अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समस्त ग्रामस्थ गावातील सर्व माता पिता बंधू भगिनी सर्व लहान आबाल वृद्ध यांनी केले होते . तर कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप ज्येष्ठ नेते तुकाराम कोद्रे, चिकू उर्फ बाळासाहेब वायकर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मावळ तालुका अध्यक्ष बबन ओव्हाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जांभुळकर, माजी चेअरमन विकास असवले, टाकवे शहर अध्यक्ष दत्तात्रय असवले,अध्यक्ष काळूराम घोजगे, गुणवंत कामगार शंकर असवले, काशिनाथ जांभुळकर,संतोष कोंडे, सोमनाथ असवले, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वाऊड संतोष मोकाशी,भगवान लोंढे,संजू जगताप,मुन्नावर आत्तार,चेतन लोंढे, साईनाथ असवले, समीर असवले,किरण साबळे उपस्थित होते.तसेच यांसह गावातील बंधू भगिनी, माता पिता लहान थोर बहुसंख्येने उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!