वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघाच्या वतीने  श्री.संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा ७३७ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.
ग्रामदैवत पोटोबा मंदिरापासून पालखी सोहळा  काढण्यात आला. या  शोभायात्रेत समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. समारंभ स्थळी भजनाचा कार्यक्रम झाला. संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी वडगावचे नगराध्यक्ष मयुर ढोरे होते. माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, मोरया महिला मंचाच्या अध्यक्षा अबोली ढोरे, तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष रविंद्र माने , राजेश बारणे( आवाज न्यूज), रामदास वाडेकर (मावळ सत्य लाईव्ह बुलेटीनचे संपादक),  गणेश विनोदे (पत्रकार दै. पुढारी), जगन्नाथ काळे पत्रकार) दै पुढारी) प्रमुख  पाहुणे  म्हणून उपस्थित होते.

  पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघाचे  तालुका अध्यक्ष  अमर  नायगावकर यांनी प्रास्ताविक केले. अनिल वेदपाठक यांनी आभार मानले.

error: Content is protected !!