वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिस स्टेशनला निवेदन वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी
वडगाव मावळ:
वडगाव शहर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या. ठिकाणी तालुक्यातून अनेक ठिकाणाहून नागरिकांची वर्दळ होत असते. प्रामुख्याने तहसिल कार्यालय, दुय्यम निबंधक, तलाठी कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, शाळा, महाविद्यालय अशी अनेक मुख्य शासकिय कार्यालय आहे. तालुक्यातून अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध कामांसाठी येत असतात. श्रीमंत महादजी शिंदे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पुण्यभूमीत बाहेरून अनेक नागरिक कुटुंब वास्तव्यास आली आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून रात्रीच्या वेळी कामावरून घरी जाणाऱ्या लोकांना लुटण्याचे प्रकार, व्यापारी बांधवास मारहाण करणे, अवैध दारू विक्री, महिलांची छेडछाड असे कृत्य करून काही तरुण मंडळी विनाकारण घोळक्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत आहेत. दिवसा सह रात्रीच्या वेळी देखील शहरातून भरधाव वेगाने काही चौकात गाडी वर आवाज काढत, आरडाओरड करत, शस्त्राचा वापर करून लोकांना लुटून मारहाण करण्याचे प्रकार होत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक या दहशतीमुळे त्रस्त आहेत, अशा घटनावर कायदा व सुव्यवस्थेचा वचक राहिलेला नाही.

पोलिसांना कोणी फोन करून माहिती दिल्यास पोलीस प्रशासन नावाची विचारणा करते त्यामुळे घाबरून कोणीही अशा घटना होत असताना पोलिसांना कळवत नाही. पोलिस घटना झाल्यावर येत आहे त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना दिसत आहे.असे गुन्हेगार ज्या चौकात बसत आहेत तिथे उपाय योजना करावी असे या निवेदनाद्वारे आपणास मागणी करण्यात येत आहे, अशा घटना पुन्हा घडल्यास वडगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी च्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल,असा  इशारा देण्यात आला.

यावेळी अध्यक्ष वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस प्रविण ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी वरीष्ठ उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, माजी नगरसेवक सुनील ढोरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक चंद्रजीत वाघमारे युवक अध्यक्ष अतूल वायकर, कार्याध्यक्ष सुरेश जांभूळकर,  मंगेशकाका ढोरे, प्रकाश  कुडे, श्रीधर ढोरे, सुधाकर वाघमारे, अतुल राऊत, मंगेश खैरे, विशाल वहीले, शरद ढोरे, सोमनाथ धोंगडे, संजय दंडेल, सुहास विनोदे, भाऊ ढोरे, मयुर गुरव, राजेंद्र चव्हाण, मच्छिंद्र कराळे, शैलेश वहीले, विशाल चव्हाण, यशवंत शिंदे, विकी भोसले, चेतन चव्हाण, भूषण ढोरे, भरत तुमकर उपस्थितीत होते.

error: Content is protected !!