वडगाव मावळ :
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघ पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९८  टक्के मतदान झाले. ६५१ सभासदांपैकी ६३६ सभासदांनी मतदान केले. प्राथमिक शिक्षक संघाच्या संचालक मंडळाची मुदत दोन वर्षांपूर्वी संपली होती. कोरोनामुळे निवडणूक झाली नव्हती. सात वर्षानंतर निवडणूक झाल्याने शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या निवडणुकीत  भक्ती शक्ती पॕनेलने वर्चस्व सिद्ध केले असून माजी अध्यक्षा व शिक्षक नेत्या शोभा वहीले यांच्या नेतृत्वाखाली भक्ती शक्ती पॅनलने बाजी मारली.

संस्थेची सभासद संख्या ६५१  असून निवडणुकीत लोकशाही स्वाभिमान सहकार पॅनल, भक्ती शक्ती पॅनल व संघशक्ती परिवर्तन पॅनेल अशी तीन पॅनलमध्ये लढत होती. संचालकाच्या १९  जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात होते. सर्वसाधारण जागेसाठी ४१, मागासवर्गीय एका जागेसाठी तीन उमेदवार ,अनुसूचित जाती जमातीच्या जागेसाठी एक उमेदवार ,भटक्या जमातीसाठी एक उमेदवार असे उमेदवार रिंगणात होते .

लोकशाही स्वाभिमान सहकार पॅनल  व लोकशक्ती पॅनलने सर्वच्या सर्व जागा लढवल्या तर संघशक्ती परिवर्तन पॅनलने १५  जागांवरती आपले उमेदवार उभे केले होते. दोन अपक्ष उमेदवार या निवडणुकीत आपले नशीब अजमावून पाहत होते. सकाळी नऊ वाजता पण संस्थेच्या कार्यालयात मतदानाला सुरुवात झाली. तीन पॅनल मध्ये चुरस असल्याने केंद्राबाहेर सकाळपासूनच शिक्षकांची मोठी गर्दी होती. तिन्हीही पॅनलने बूथ उभारले होते. सर्व उमेदवार हा जोडून रांगेत उभे राहून मतदारांना शेवटच्या क्षणी देखील मतदानासाठी आव्हान करीत होते. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची माहिती निवडणूक अधिकारी विनोद कोटकर यांनी दिली.

या अटीतटीच्या लढतीत सर्वसाधारण जागेवर नारायण ज्ञानेश्वर गायकवाड ,मनोज शांताराम भांगरे,प्रमोद तुकाराम भोईर,नारायण सिताराम कांबळे,अनिल अर्जुन कळसकर,आण्णासाहेब भिमराव ओहोळ,संजय हिरामण ठुले
राहुल बाळकृष्ण जाधव,यशवंत अशोक काळे,संदीप शंकर सपकाळ,हरीभाऊ दशरथ आडकर,राकेश राम चांदोरकर,गणेश नबू धिवार,नितीन दत्तू वाघमारे

महीला प्रवर्गात  सुरेखा संदीप औटी,संगिता मनोहर शिरसाठ
अनु.जाती/ जाती प्रवर्गात  गेणु शिवराम मोरमारे प्रवर्गात भ.ज.क  राहुल विलास लंबाते , इतर मागास प्रवर्गात
अतुल किशोर वाघ विजयी झाले.

You missed

error: Content is protected !!