टाकवे बुद्रुक:
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,माध्यमिक विद्यालय, इंग्लिश मिडियम स्कूल,गावकामगार तलाठी कार्यालय,विविध कार्यकारी सोसायटी सह  आंदर मावळ मधील सर्व प्राथमिक, माध्यमिक कॉलेज इतर संस्थेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक या ठिकाणी जमीन देणगीदार संतोष असवले यांच्या हस्ते दरवर्षीप्रमाणे ध्वजारोहण करण्यात आले.तलाठी ऑफिस  नवीन कार्यालय या ठिकाणी पोलीस पाटील अतुल असवले यांच्या हस्ते, ग्रुप ग्राम. टाकवे बु. सरपंच सुवर्णा असवले यांच्या हस्ते,विविध कार्यकारी सोसायटी चेरमन पांडुरंग मोढवे यांच्या हस्ते,न्यू इंग्लिश स्कूल & ज्युनियर कॉलेज येथील विद्यार्थीनी इयत्ता बारावी मध्ये प्रथम क्रमांक आलेली रचना  शिंदे, व संस्थेचे उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे यांच्या हस्ते,बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल येथे दिल्ली पोलीस मध्ये कार्यरत असलेले टाकवे बुद्रुक गावचे सुपुत्र महेश दत्तात्रय असवले  यांच्या हस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी राजू तडवी यांच्या हस्ते. ग्रुप. ग्राम.भोयरे सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांच्या हस्ते, खांड निळशी ग्रुप. ग्राम. सरपंच आनंता पावशे यांच्या हस्ते  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांड येथे ध्वजारोहण संपन्न झाले. दरम्यान सर्व गावातील पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.
 
टाकवे बुद्रुक सह आंदर मावळ मध्ये संपूर्ण गावा गावातून विद्यार्थ्यांची भव्य अशी  तिरंगा रॅली काढण्यात आली.भारत माता की जय  प्रजासत्ताक दिनाचा विजय असो या  घोषणा करत मंगलमय वातावरणात यामध्ये सर्व शाळेतील शिक्षक गावातील सर्व संस्थेवरील विविध पदाधिकारी राजकीय सामाजिक  कला क्रीडा सांप्रदाय आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!