लोणावळा:
विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चीत करून न्यूनगूड न बाळगता आवाहानांना आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास यश निश्चित मिळते,असा विश्वास शिक्षक नेते राजेश गायकवाड यांनी व्यक्त केला.

सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट सोसा.लि.मुंबई या पतसंस्थेच्या लोणावळा शाखेचा सभासद पाल्य गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड बोलत होते. यशाचे सर्वोच्च शिखर प्राप्त करण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणे महत्वाचे आहे,असे सांगून गायकवाड म्हणाले,”  एक दिवस असा येईल तुम्ही यशाच्या उच्च शिखरावर असाल.

दरवर्षी संस्थेच्या वतीने सभासदांच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा एक भेटवस्तू प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात येतो यावर्षीही लोणावळा शाखेत हा कार्यक्रम संपन्न झाला. या गुणगौरव कार्यक्रमास अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना तुम्ही गुणवंत आहात यशवंत व्हा किर्तीवंत व्हा आई वडिलांचे नाव उज्वल करा मोबाइल चा सकारात्मक वापर करा आणि त्यातून शैक्षणिक विकास साधावा असे आवाहन  केले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना. सभासदांनी
कॅशलेस मेडिक्लेम योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमास पालक संचालक तुकाराम बेनके, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव विकास तारे,पुणे जिल्हा शिक्षक परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे,धनकवर शिंदे,खजिनदार सतेष शिंदे,संचालक जगन्नाथ जाधव, शकिल अन्सारी,गोविंदराव सुळ,वैशाली बेलोसे प्रभारी शाखा व्यवस्थापक दिपक पाटील लेखापाल प्रसाद शिंदे,रणजित पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे यांनी केले सुत्रसूचलन गोरक्ष डुबे यांनी केले. आभार संचालिका जयश्री गव्हाणे यांनी मानले.

You missed

error: Content is protected !!