पवनानगर :
कोळे चाफेसर गावच्या हद्दीत पानसोली येथे वनविभाग व  वन्यजीव रक्षक मावळ संस्थेने एका बिबट्याला जेरबंद केले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.

पुणे जिल्ह्याच्या पश्चिमकडेच्या तालुक्यात सह्याद्री डोंगररांगा, धरणे, वन व मोठ्या प्रमाणात उसलागवड असल्याने बिबट्याचा वावर जास्त आहे. पानसोली (ता.मावळ ) येथे बिबट्या दिसल्यानंतर येथील स्थानिक महिला श्रीमती दिपाली आनंदा ठोंबरे यांनी गावातील नागरिकांनी दूरध्वनीवर वनविभागाला माहिती कळवली माहिती मिळताच वडगाव मावळ वन परिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव,  श्रीमती डी. पी. डोमे वनपाल देवले, वनपाल वडगाव, वनपाल लोणावळा आणि रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव व वन्यजीव रक्षक, मावळ यांची टीम घटनास्थळी जाऊन बिबट्याला जेरबंद केले.

एक वर्ष वयाचा बिबट्या तारेच्या कुंपण मध्ये अडकल्याने व त्यांच्या चारही पायाला काचे मुळे जखम झाल्याने रेस्क्यु करण्यात आला. सध्या शेतामध्ये ऊसतोड चालू असल्याने बिबट्याच्या लपण्याच्या जागा कमी होत आहेत. त्यामुळे बिबटे मनुष्यवस्तीत शिरकाव करताना दिसत आहेत.
वनविभाग वडगाव मावळ तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था यांच्या टीमने बिबट्याला जेरबंद केले आहे.

यावेळी बोलताना वनपरिक्षक अधिकारी हनुमंत जाधव म्हणाले की, बिबट जखमी असल्याने पुढील उपचारासाठी रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट, भुगाव येथे पाठवण्यात आले आहे.

error: Content is protected !!