वडगाव मावळ:
  येथील स्व.पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठान च्या सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्ष पदी पत्रकार गणेश विनोदे यांची तर कार्याध्यक्ष पदी सदाशिव गाडे व कार्यक्रमप्रमुख पदी विवेक गुरव यांची निवड करण्यात आली असून यावर्षी १६ एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन व नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी विलास दंडेल, राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, अतुल राऊत, सुनील शिंदे, मंगेश खैरे, रोहिदास गराडे, शरद ढोरे, सोमनाथ धोंगडे, खंडू काकडे, महेश तुमकर, संतोष निघोजकर, विनायक लवंगारे, संजय दंडेल, गणेश झरेकर, दर्शन वाळुंज, कार्तिक यादव उपस्थित होते.

यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा १६ एप्रिल २०२३ रोजी संपन्न होणार असून यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच जोडप्यांना संसारपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, साड्या, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. दि.३१ मार्च पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आलें आहे.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला सामुदायिक विवाह सोहळा हा उपक्रम गेली नऊ वर्षांपासून राबविण्यात येत असून सुमारे १५० जोडपी विवाहबद्ध झाले आहेत. यावर्षी सोहळ्याचे दशकपूर्ती वर्ष असून यावर्षी चा सोहळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांसह साजरा करण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष गणेश विनोदे, कार्याध्यक्ष सदाशिव गाडे व कार्यक्रमप्रमुख विवेक गुरव यांनी सांगितले.

सामुदायिक विवाह सोहळा समिती नूतन कार्यकारिणी :
गणेश विनोदे (अध्यक्ष), सदाशिव गाडे (कार्याध्यक्ष), विवेक गुरव (कार्यक्रमप्रमुख), शंकर ढोरे (उपाध्यक्ष), अक्षय बेल्हेकर (सचिव), अनिल कोद्रे (खजिनदार), महेश तुमकर (सहखजिनदार).

error: Content is protected !!