पिंपरी:
पिंपरी चिंचवडचे लोकनेते स्व.आमदार लक्ष्मणभाऊ पांडुरंग जगताप यांच्या  पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवडगाव, पुणे येथे शोकसभा होणार आहे.

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अजित पवार विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य,चंद्रकांत पाटील पालकमंत्री पुणे जिल्हा, प्रा. डॉ. तानाजी सावंत मंत्री सार्वजनिक आरोग्य महाराष्ट्र राज्य,अविनाश महातेकर राज्यमंत्री महाराष्ट्र राष्ट्रीय सरचिटणीस आर.पी.आय.,बाळा नांदगावकर मनसे नेते ,भाई जगताप अध्यक्ष मुंबई काँग्रेस आमदार विधानपरिषद महाराष्ट्र
श्रीरंग बारणे खासदार मावळ लोकसभा,महेश लांडगे आमदार भोसरी विधानसभा शहराध्यक्ष भाजपा पिं.चिं. शहर,आण्णा बनसोडे आमदार पिंपरी विधानसभा,दिलीप बंड  विभागीय आयुक्त पुणे विभाग,उमा खापरे आमदार विधानपरिषद यांच्यासह पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

You missed

error: Content is protected !!