टाकवे बुद्रुक:
येथील बाळराजे असवले इंग्लिश मिडियम स्कूल व  सरपंच चिंधू मारुती असवले इंग्लिश मिडीयम हायस्कूल मध्ये  राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

त्यावेळी विद्यार्थ्यांनी जिजाऊ ,स्वामी विवेकानंद व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा केल्या. तसेच अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. मुख्याध्यापक किरण हेंद्रे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राज सरांनी सर्वांचे आभार मानले, इतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद तसेच सावित्रीबाई फुले व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी आपले विचार प्रकट केले.

संस्थेचे पदाधिकारी, पालक, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वेगवेगळे सण समारंभासह शाळेत अनेक शैक्षणिक उपक्रमांची बाराही महिने रेलचेल असते.

error: Content is protected !!