मावळसत्य लाईव्ह बुलेटीन:
पुत्र व्हावा ऐसा गुंडा । त्याचा तिही लोकी झेंडा । कन्या ऐसी देई। जैसी मिरा मुक्ताबाई ।।” या संत ओवीची आठवण राज खांडभोर या जिवाभावाच्या मित्राकडे पाहिले की लगेच येते. गाव खेड्यातील या तरूणाने भावाने’ पुत्र व्हावा ऐसा गुंडा! त्याचा तिही लोकी झेंडा’ हे संत वचन आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरवले आहे.

आई.. वडील.. भाऊ… बहिणी.. पत्नी ..मुले ..मित्र अन नातेवाईकांना सार्थ अभिमान वाटावा असे त्याचे वागणे. वडीलांचे छत्र फार लवकर हरपलेल्या राजूला संस्काराचे बाळकडू त्यांच्या कडूनच मिळाले. राज खांडभोर मावळ तालुक्यातील राजकीय पटलावर आपली हुकमत सिद्ध शकेल इतकी क्षमता असलेला अत्यंत सुस्वभावी पण तितकाच कणखर तरूण.

राजकीय आणि सामाजिक कार्याचा वसा आणि वारसा पाचवीलाच पुजलेला.अमोघ वकृत्वाचा उपजत मिळालेल्या गुणवत्तेवर त्याने खूप व्यासपीठ गाजवलेली. तीही वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून. नागाथली मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खेडे. राज्यभरातील शिक्षकांच्या आशा अपेक्षा आणि प्रेरणेचा ठिकाण. राज्यभरातील शिक्षकाच्या समस्येला वाचा फोडणारे माहेरघर. माझ्या गुरुजींचा मानसन्मान वाढला पाहिजे आणि त्याला सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे म्हणून पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरणारे दिवंगत शिक्षक नेते धो.य.खांडभोर यांचे ज्येष्ठ सुपुत्र राजू खांडभोर.

आदरणीय धो.य.  खांडभोर गुरूजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र. खांडभोर गुरूजी काँग्रेस विचाराची कास धरणारे पक्के गांधीवाद नेते. लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब व माजीमंत्री मदन बाफना यांच्यावर प्रचंड श्रद्धा असलेले खांडभोर गुरूजी यांचा जनसंपर्क दांडगा होता. काँग्रेस विचारसरणी असलेल्या गुरुजींचे सर्व राजकीय पक्षात सलोख्याचे संबंध होते. त्यांचे काँग्रेस नंतर राष्ट्रवादीत मित्र होते,तसे भाजप आणि सेनेतही मित्र होते.

राज त्यांचा लाडका चिरंजीव, प्राथमिक शिक्षण नागाथलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेऊन राजूने माध्यमिक शिक्षण वडगावच्या न्यू इंग्लिश स्कूल आणि तळेगावच्या रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन मध्ये घेतले. अभियांत्रिकी शिक्षण पुण्यात झाले .नोकरी संभाळून त्याने राजकारणाला समाजकारणाची जोड देत ‘धर्मनिरपेक्ष विचाराचा ‘प्रचार आणि प्रसाराला घड्याळाची गती दिली. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष व पीडीसीसी बॅकेचे संचालक सुनिल चांदेरे, तत्कालीन विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष किरण बेनगुडे यांच्या नेतृत्वाखाली राजूने ग्रामीण भागात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखा स्थापन करून आपले संघटन सिद्ध केले.

याच दरम्यान,राज खांडभोर समर्थकांनी राजूसाठी ‘ टाकवे बुद्रुक वडेश्वर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मागितली
होती. कमी वयात जिल्हा परिषदेची उमेदवादी मागण्याचा
बहुमान राजूलाच. पक्ष आदेशानुसार जेव्हा राष्ट्रवादीला
कार्यकर्त्यांचा वणवा होता त्या काळात टीम राजूने राष्ट्रवादी
युवक काँग्रेस मध्ये हिरिरीने सहभाग घेतला. राजकारणाचे
बाळकडू असले तरी कौटुंबिक जबाबदारी महत्वाच्या
मानलेला हा तरूण कुटूंब वत्सल आहे.

आपले कर्तृत्व पार पाडण्यासाठी या तरूण मित्राने राजकीय त्याग केला. राजकीय त्याग केला असला तरी समाजाच्या प्रती असलेला जिव्हाळा कधीच घटू दिला नाही. मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्था, वडेश्वर विविध कार्यकारी संस्था, ग्रामदैवत म्हसोबा देवस्थान ट्रस्ट,राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ या सारख्या अनेक सामाजिक संस्थेतून त्याचे कार्य सुरूच आहे. गरीब सर्वसामान्य शेतकरी,आदिवासी, मजूरा पासून लोकप्रतिनिधी, राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कार्पोरेट क्षेत्रातील दिग्गजांशी राजूची घनिष्ठ मैत्री आहे.

या मैत्रीचे धागे त्यांने अखंड पणे गुंफून ठेवले आहे. या जोरावर त्याचे काम कायम उजवे ठरते. अत्यंत गोड बोलणा-या या तरूण मित्राला मकरसंक्रांतीच्या पूर्वेला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा.
( शब्दांकन-विक्रम कदम, चिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस)

error: Content is protected !!