टाकवे बुद्रुक : 
मागील काळामध्ये गणपती मंडळ आरती यामध्ये गाव भेट दौऱ्याच्या वेळी येथील नागरिकांनी माजी  उपसरपंच रोहिदास असवले यांच्याकडे जेवणाच्या पंगतीसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी केली होती.  त्या अनुषंगाने  उपसरपंच रोहिदास असवले यांनी   दिलेला शब्द पूर्ण करत नाणे मावळ मधील थोरण या गावाला पंगतीचे साहित्य सुपूर्त केले आहे.

नाणे मावळ मधील थोरण येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम  सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. थोरण येथे  संध्याकाळी किर्तन रुपी सेवा संपन्न झाल्यानंतर टाकवे नाणे जिल्हा परिषद गट भाजपा अध्यक्ष रोहिदास असवले यांचा येथील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला करण्यात आला.

आयोजक समस्त ग्रामस्थ थोरण .
कार्यक्रमाचे नियोजन गावातील सर्व  माता पिता बंधू भगिनी सर्व लहान आबाल वृद्ध यांनी केले होते . तर कार्यक्रमाच्या वेळी पाहुणे म्हणून तुकाराम कोद्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य रोहिदास जांभुळकर, रवींद्र आंद्रे,अध्यक्ष रवीभाऊ कुठे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष वाऊड संतोष मोकाशी, माजी चेअरमन विकास असवले, भगवान लोंढे, संजू जगताप, भाजपा टाकवे शहर अध्यक्ष दत्तात्रय असवले, माजी अध्यक्ष काळूराम घोजगे, मुन्नावर आत्तार,चेतन लोंढे, काशिनाथ जांभुळकर,साहेबराव आंबेकर, संतोष कोंडे सोमनाथ असवले उपस्थित होते.

error: Content is protected !!