स्नेहल बाळसराफ यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार
तळेगाव स्टेशन:
सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीचे औचित्य साधून कर्जत (जि. अहमदनगर) येथील रयत शिक्षण संस्थचे दादा पाटील महाविद्यालय यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असलेल्या स्नेहल बाळसराफ यांना ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान केला.

भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य संमेलन रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालय कर्जत येथे हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार सुप्रिया सुळे होत्या. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या मीनाताई जगधने, आमदार रोहित पवार, स्वागताध्यक्ष राजेंद्र फाळके व सुनंदा पवार, डॉ दत्तात्रय बाळसराफ, प्राचार्य डॉ. संजय नगरकर उपस्थित होते.

error: Content is protected !!