कटारिया प्रशालेची सेमी फायनल मध्ये स.प. कॉलेजवर मात
पुणे:
शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित १७  वर्षाखालील मुलांच्या गटाच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शेठ दगडुराम कटारिया प्रशालेने स.प.  कॉलेजचा सुपर ओव्हर मध्ये पराभव केला.
   बीएमसीसी च्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत पहिल्या सामन्यात शेठ दगडुराम कटारिया प्रशालेने प्रथम फलंदाजी करताना १४९  धावा केल्या त्यात महत्त्वाचा वाटा चैतन्य कोंडभर ने केलेल्या ८४ धावांचा होता .
   त्याला ज्ञानराज धायगुडे ने सुरेख साथ दिली मानस गडभरे ने तीन गडी बाद केले प्रत्युत्तर देताना स.प. कॉलेजचा डाव १४९  धावात आटोपला यावेळी पार्थ क्षीरसागर ने ५३ धावा केल्या त्याला सुजल आखाडेने सुरेख साथ दिली. श्रीनिवास जाधव ने चार गडी बाद केले सामना टाय झाल्याने घेण्यात आलेल्या सुपर ओव्हर मध्ये स.प. कॉलेजने दोन बाद 9 धावा केल्या.
    तर शेठ दगडूराम कटारिया प्रशालेच्या  चैतन्य कोंडभर ने तीन चेंडूत नाबाद १० धावा करून शेठ दगडूराम कटारिया प्रशालेला महत्त्वपूर्ण विजय मिळवून दिला. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत स.प.कॉलेजविरुद्धच्या सामन्यात शेठ दगडुराम कटारिया प्रशालेचा चैतन्य कोंडभर याने ८४  धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून संघाला सुपर ओव्हर मध्ये तीन चेंडूत दहा धावा करून संघाला विजय प्राप्त करून दिला.चैतन्यचे सर्वत्र  अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!