वडगाव शहर भाजपच्या वतीने चित्रकला, रांगोळी स्पर्धा
वडगाव मावळ :
स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त वडगाव शहर भाजपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चित्रकला स्पर्धेत सुमारे दोनशे तर रांगोळी स्पर्धेत सुमारे पन्नास स्पर्धकांनी सहभाग घेतला. शहर भाजपने ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर चित्रे रेखाटली.
महिलांनी सुबक रांगोळ्या काढल्या. सहभागी स्पर्धकांना नगरसेवक शंकर भोंडवे भाजप युवती अध्यक्षा राणी म्हाळसकर यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस मकरंद बवरे यांनी सूत्रसंचालन केले.
कल्पेश भोंडवे यांनी आभार मानले. पूजा पिंगळे, श्रेया भंडारी यांनी रांगोळी स्पर्धेचे संयोजन केले. बक्षीस वितरण व वडगाव भाजप दिनदर्शिकेचे प्रकाशन शनिवारी (ता. ३१) करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनावेळी माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सरपंच संभाजीराव म्हाळसकर, माजी उपसरपंच सुधाकर ढोरे, शहराध्यक्ष अनंता कुडे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, किरण भिलारे, माजी नगरसेवक रविंद्र काकडे, भूषण मुथा, रविंद्र म्हाळसकर, युवा अध्यक्ष विनायक भेगडे, पवन भंडारी, गोपाळराव गुरव, नितीन धर्माधिकारी, कुलदीप ढोरे उपस्थित होते.

error: Content is protected !!