टाकवे बुद्रुक:
भोयरे ग्रामपंचायतीच्या प्रचारात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावल्याने परिसरात भोयरे ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा सरपंच झाला असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या येण्याने राष्ट्रवादीच्या बालकिल्याला धका लागला असल्याचे बोलले जात आहे.
भोयरे ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा अमोल भोईरकर, सदस्यपदी ऋषिकेश तानाजी भोईरकर, बाळू तानाजी भोईरकर, रामदास पारू भोईरकर, रंजना पोपट भोईरकर, संगीता अनिल वाघमारे, नीता तानाजी भोईरकर  विजयी झाले आहेत. निवडणुकीचे निकाल हाती येताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता.
नवनिर्वाचित सरपंच वर्षा अमोल भोईरकर यांचे पती मागील पंचवार्षिक ला सरपंच पदासाठी उभे होते परंतु त्यांना तीन मतांनी पराभव पत्करावा लागला होता.  आताच्या निवडणुकीमध्ये तो पराभव भरून काढत अमोल भोईरकर यांच्या पत्नीने तब्बल 120 मतांनी विजय मिळविला आहे.
दरम्यान टाकवे गावचे माजी उपसरपंच रोहिदास असवले यांनी     निवडणूक आलेल्या सर्व भाजप सरपंच व सदस्यांचा सत्कार केला आहे.

error: Content is protected !!