तब्बल २० वर्षीनी पुन्हा भरली शाळा ; टाकवेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न
टाकवे बुद्रुक :
येथील न्यु इग्लिश स्कुल  माध्यमिक विद्यालयातील एकाच बाकावर बसलेले व भविष्याची वाटचाल करताना आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेले शालेय जीवनातील सवंगडी मित्र मैत्रिणी शाळेची इयत्ता दहावीच्या पहिली बॅचच्या स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २० वर्षांनी एकत्र आले होते.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थ्यांना
ग्रुपवर संघटीत करून या मेळाव्याच्या चर्चा घडवून हा
स्नेहमेळावा आयोजित करण्याचे आवाहन केले. त्या
आवाहनाला प्रतिसाद देऊन या तत्कालीन विद्यार्थी व
विद्यार्थीनीनी या स्नेहमेळाव्याचे नेटके आयोजन केले होते
शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येक क्षणाचा आनंद आणि कौतुकाची भावना मनात ठेवत कार्यक्रम घेण्यात आला १९९९-२० मधील टाकवे न्यु इग्लिश स्कुल  माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा आंध्रा फार्म हाऊस येथे  संपन्न झाला.या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा व
ओळख परेड, तसेच स्नेहभोजन व शाळेविषयी जुन्या
आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त
केले.यावेळी पाचवी ते दहावी पर्यंत वर्गशिक्षक म्हणून गुरु समान राहीलेल शिक्षक माणिक जाधव सर यांचा यानिमित्ताने सन्मान करण्यात आला
स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी दिलीप आंबेकर, अमोल गायकवाड, सुरेखा ननवरे, सुरेखा शिर्के यांनी केले
विशेष परिश्रम घेतले.

error: Content is protected !!