टाकवे बुद्रुक:
आंदर मावळ मधील टाकवे वडेश्वर या रस्त्यावरती माऊ येथे एका पस्तीस वर्षीय नागरिकाचा  दुचाकी अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. पप्पू दारकू हिलम ( वय 35 रा.वडेश्वर ) असे या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे .
याबाबतची अधिक माहिती अशी की, पप्पू दारकू  हिलम हा त्याच्या मुळ गावी बेलज येथे काही कामा  निमित्ताने घरी गेला होता. तो माघारी येत असताना टाकवे वडेश्वर रस्ता माऊ येथील परिसरामध्ये रस्ता अरुंद असल्याने तसेच रस्त्याचा भाग सखल व त्या ठिकाणी मोरीचे कठडे अनेक वर्षापासून तुटलेले  असल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो रस्त्याच्या खाली ओढ्यामध्ये दगडावरती जाऊन पडला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
हिलम हा वडेश्वर येथे वीट भट्टी वरती वीट कामगार म्हणून काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, तीन मुले, आई वडील, दोन भाऊ असा मोठा परिवार आहे सर्व परिवाराची जबाबदारी त्याच्यावरती होती.
दानशूर व्यक्तींनी व लोकप्रतिनिधींनी त्या कुटुंबास मदत करावी. कारण घरची परिस्थिती अतिशय हलाकीची आहे तसेच मृत पावलेल्या त्या युवकाच्या पत्नीला आजाराने ग्रासले असल्याने त्या कुटुंबांनी मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सहादू कान्हू शिंदे, ( वय-45 ) रा. वडेश्वर यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
( दि.14 ) रोजी.12:30 वा.चे सुमारास माऊ गावचे हद्दीत टाकवे वडेश्वर रोडवर असलेल्या ओढ्यात. पप्पू दारकू हिलम याचा दुचाकी मोटार सायकल नं.एम.एच.12 एच.एम. 8412 ही गाडी माऊ येथून वडेश्वर येथे जात असताना माऊ गावचे हद्दीत वळणावर त्याचे मोटार सायकलवरिल नियंत्रण सुटल्याने मोटार सायकल ही रोडचे कडेला असलेल्या ओढ्यात पडून अपघात होवून अपघातामध्ये त्याचे डोक्यास गंभीर दुखापत होवून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
पुढील अधिक तपास वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस  बिट अहमलदार ननवरे हे करीत आहेत.

error: Content is protected !!