कामशेत:
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेल मावळ तालुका तर्फे जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा कामशेत येथे शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी अल्पसंख्याक सेल मावळ तालुका अध्यक्ष अमीर उर्फ बाबाभाई मुलाणी , महिला अल्पसंख्याक सेलच्या अध्यक्ष शबनम खान,माजी नगरसेवक आयुबभाई शिकिलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमांस शब्बीर शेख, सोहेल शिकीलकर,निसार शेख, मुनव्वर इनामदार,नईम मुलाणी,हबीबभाई, अब्दुलभाई, इरफान बागवान  सर्व शिक्षक वर्ग, इतर मान्यवर व  बहुसंख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
मावळ तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अमीर उर्फ बाबा मुलाणी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगितले.नेतृत्व गुणाच्या वाढीसाठी मैदानी खेळ आणि व्यायामाचे महत्व सांगीतले.

error: Content is protected !!