वडगाव मावळ:
  मावळ तालुक्याचे माजी आमदार दिगंबर बाळोबा भेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, मुली,भाऊ,पुतणे, सुन,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
  उद्योजक मनोहर भेगडे व प्रशांत भेगडे त्यांचे पुत्र तर मावळ मुळशी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब भेगडे त्यांचे बंधू तर मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे त्यांचे पुतणे होत.
  पंढरीचे वारकरी ते विधानसभेचे मानकरी हा बहुमान त्यांना मावळ तालुक्याच्या जनतेने दिला. दहा वर्षे त्यांनी मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व केले. भेगडे यांचा जनसंपर्क दांडगा होता. अत्यंत शांत संयमी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा तरूण पिढी पुढे आदर्शवत होती.

error: Content is protected !!