मामानेच केला अल्पवयीन भाचीचा बलात्कार
वडगाव मावळ :
मामा भाचीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना मावळात घडली आहे. मामानेच आपल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना मावळ तालुक्यात मंगळवारी (दि. ६) घडली असून, याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
णञपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मामाने आपल्या भाचीस यात्रेतील पाळण्यात बसवितो असे सांगुन तिला मोटार सायकल वरून घेऊन जाऊन टाकवे गावचे पुढे गेले नंतर रोडचे कडेला असलेले झाडीत सायंकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान घेवुन गेला. तेथे तिचे सोबत शारीरिक संबंध ठेवून तिचेवर अत्याचार करून तिचेवर बलात्कार केला आहे. तसेच तिस तु जर कोणाला सांगितले तु तर मी तुला व तुझ्या मम्मीला ठार मारेल अशी धमकी दिली आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष जाधव हे करत आहेत.

error: Content is protected !!