भटकंती किल्ले सरसगड पालीची
मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष:
वार गुरुवार… वेळ सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराची…
आमचा प्रवास कामशेत इथून सुरू झाला…. साई डांगले, ज्ञानेश्वर आंद्रे,संतोष साबळे व मी सुभाष भोते कामशेत इथून निघालो….सकाळी खूपच थंडी पडली होतीच. साधारणतः दोन तासाचा असणार हा प्रवास आम्ही अवघ्या दीड तासांमध्ये पूर्ण केला….
सर्व प्रथमतः आम्ही पाली येथे ८:१५ मिनिटांनी पोहचलो. प्रसिध्द श्री.बल्लारेश्वर गणपतीचे दर्शन घेतले.दर्शन घेऊन थोडाशी पोटाची भूकही भागवायची होती म्हणून नाश्ता केला.नाष्टा केल्यानंतर वेळ खूपच झाला होता.सूर्य हळूहळू डोक्यावरती येत होता.तापही वाढले होता.जणू काही सूर्यदेव आम्हला गडावरती जाण्यासाठी सांगत होते.हे पाहून आम्ही लवकरात लवकर किल्ल्याच्या मार्गाला जाण्यासाठी सुरुवात केली.
सुरुवातीला वाट आहे कुठून हेच काही समजेना स्थानिक नागरिकांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला जाण्यासाठी मार्ग दाखवला.गाडी आम्ही झाडाखाली पार्किंग करून तेथून पुढे पायवाटेने आम्ही झाडाझुडपातून निघालो जाताना अजून दोन साथीदार आम्हाला मिळाले.साई डांगले,संतोष साबळे व ज्ञानेश्वर आंद्रे यांची त्यांच्याशी खूपच गट्टी जमली या गट्टीमध्ये त्यांचं नाव आम्ही जय वीर असे ठेवले. ते दोन कुत्रे आमच्याबरोबर किल्ल्यावरती येण्यास आमच्या पुढे पुढे चालू लागले.
पायवाटेने जाता जाता संपूर्ण गड हा चढाईचा असल्यामुळे उतार हा नाहीच ! सपाटी ही नाहीच ! पूर्ण चढाई खूप होती व दम लागत होता. हळू – हळू आम्ही गडाच्या दिशेने चाललो होतो. जाताना सर्वप्रथमता आम्हाला एक पाण्याचे टाके लागले. पाण्याचे टाके पाहिल्यानंतर असे जाणून आले की त्यावरती खूपच तवंग आला होता. टाकीची खोली मोजण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केले परंतु गाळ असल्या कारणाने खोलीचा अंदाज काय आला नाही. तिथून पुढे चालतच राहिलो त्यानंतर पुढे एक मोठी शिळा आली. म्हणजेच दगड त्या दगडावरून आम्ही जात असताना संपूर्ण दगडाला खाचे मारले होते.
कुठेच धरण्यासाठी वायरपचा वापर केला नव्हता. तेथे झुकूनच जावं लागत होते अशा पद्धतीमध्ये ती खडतड वाट पार करत आम्ही व आमचे अजून दोन साथीदार आम्ही वरती असलेल्या पाण्याच्या टाकी पाशी पोहोचलो.पाण्याच्या टाकी शेजारीच एक सुंदर गुफा होती. त्या गोष्टीच्या आत मध्ये जाण्यासाठी आपल्याला बैठक पद्धतीने जावे लागणार होते. आम्ही त्या ग्रुपमध्ये जाऊन पाहिले साधारणता १० पावले चालल्यानंतर आत मध्ये एक मोठी खोली आहे.
आम्ही ते पाहून पुन्हा ९६ कोरीव पायऱ्या पार करून आम्हाला दिंडी दरवाजे पर्यंत पोहोचायचे होते. परंतु पायऱ्या अतिशय चढण्यासाठी अवघड होत्या. उंच उंच त्या पायऱ्या गुडघ्याच्या लेवल पर्यंत असणाऱ्या पायऱ्या ह्या पायऱ्या संपूर्ण पार करत आम्ही हळूहळू दिंडी दरवाजापर्यंत पोहोचलो. दिंडी दरवाज्यापाशी गेल्यानंतर थोडेस अराम करून मित्रांनी फोटोग्राफी केली तिथे असणारे अवशेष पाहून घेतले.
दरवाज्याच्या आत मध्ये गेल्यानंतर समोरच आपल्याला दोन खोल्या पाहायला मिळतात.तिथून पुन्हा आपल्याला पायऱ्या लागतात.
त्या पायऱ्या वरती चढल्यानंतर आपल्याला डाव्या साईडला एक बुरुज दिसून येतो. सध्या त्याठिकाणी खूप मोठे गवत झाले आहे.त्यानंतर पुन्हा माघारी फिरून बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो समोरच किल्ल्याचा नकाशा आपल्याला पाहायला मिळतो.त्या नकाशा वाचून त्याचा फोटो घेतला. या नकाशापासून आपण वरती आल्यानंतर आपल्याला ओम अक्षर लिहिलेले आणि एक समाधी अज्ञात समाधी माहित नाही ! कोणाची होती. परंतु त्या समाधीच्या वरच्या साईटला ओम हा लिहिलेला होता.
त्यानंतर सरळ आणि त्या बाजूने पुढे पुढे जात राहिलो गेल्यानंतर असं तीन ते चार पाण्याचे टाके पाहायला मिळाले. व एका पाण्याच्या टाकीच्या वरच्या बाजूला तीन खोल्या कदाचित सैनिकांच्या राहण्यासाठी असाव्यात त्या खोल्यांमध्ये क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो पुढे जाताना आपल्याला पाण्याच्या टाक्यात पाहायला मिळतात ह्या पाण्याच्या टाक्या काही शेवाळाने भरलेले आहेत तर काही टाक्याच्या पाण्यावर तवंग आलेले दिसून येतात.परंतु हा तवंग किंवा हे शेवट बाजूला केल्यानंतर स्वच्छ पाणी आपल्याला मिळते.
किल्ल्यावरती गेल्यानंतर दोन ते तीन स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे टाकी आहेत. त्यातील एका पाण्याच्या टाकीमध्ये असंख्य मासे आहेत. त्या टाकीतले पाणी आम्ही काढण्यासाठी उतरलो पाणी घेऊन साई बाहेर आला साईने सांगितले की ह्या पाण्याच्या टाकीमध्ये असंख्य मासे आहेत व ते तुम्ही आत मध्ये येऊन पहा मासे असंख्य होते बाटली बुडवल्यानंतर खूपच मासे त्या बाटलीच्या जवळ येत होते हे दृश्य खूपच पाहण्यासारखं होतं ! पाणी पिल्यानंतर मन शांत झाले.तिथून पुढे हळूहळू पुढे चालण्यास सुरुवात केले परंतु आमच्या डोकीच्या वरतीच तीन आगी मोहळाचे पोकळे आम्हाला दिसून आले व काही मधमाशा फिरताना दिसून आल्या काही काळ आम्ही घाबरलो परंतु शेवटी गड पाहायचाच होता.
एकच ध्येय गड पाहण्याचे होते. आम्ही चौघेही जण गडाच्या दिशेने सुरुवात केली.बालेकिल्ल्यावरती जाताना आपल्याला पहिल्यांदा महादरवाजा दिसून येतो. त्या दरवाज्याच्या बाजूलाच एका बुरुजाला जाण्यासाठी छोटीशी वाट आहे त्या वाटेने खाली उतरण्याचा निर्णय आम्ही घेतला त्या वाटेने आम्ही चौघेही जण खाली उतरलो हळूहळू खाली उतरलो.खाली उतरल्यानंतर खूपच मोठा बुरुज व त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असे छोटे बुरुज आम्हाला पाहायला मिळाले.त्यानंतर आम्ही पुन्हा तो बुरुज पाहून महादरवाजाच्या दिशेने निघालो. महादरवाजाची कला आकृती,आकार व बांधणी सुंदर पद्धतीमध्ये केलेली आहे.महादरवाजा पाहून झाल्यानंतर आपल्याला दक्षिणेच्या साईटला बल्लारी ईश्वर मंदिराची पाटी दिसून येते.
मात्र इथे आपली मोठी फसगत होते कारण इथे वरती जाण्यासाठी कोणत्याच पायऱ्या नाहीत तर दोन पाऊलवाटा आहेत या दोन्ही पाउल वाटा वेगवेगळ्या दिशेने जातात.सर्वप्रथम तर आम्हीच फसलो परंतु त्या पाऊलवाटेच्या शेजारीच एका पडलेल्या वाड्याचा अवशेष आहे. त्या वाड्याच्या शेजारी एक पुरुष व एक लहान मुलगी बसली होते.आम्ही त्यांना विचारणा केली आपले नाव काय त्यांनी दिनेश पाटील असे नाव सांगितले व त्यांची एक छोटीशी मुलगी जी अवघे नऊ वर्षाची होती तिला विचारल्यानंतर तिने तिचं नाव सांगितलं पल्लवी पाटील मूळची कल्याणची अवघे नऊ वर्षे असलेली ही मुलगी होती. तिला गडकिल्ल्यांची आवड,संस्कार तिच्या वडिलांकडूनच मिळाले होते.
पल्लवीला लहानपणापासूनच असे संस्कार मिळाले असल्यामुळे ती गड पाहून आनंदित होती.मनामध्ये विचार आला.लहानपणापासूनच आपण आपल्या मुलांना जर धर्माचे, गड किल्ल्यांचे,छत्रपती शिवाजी महाराजांचे, इतिहासाचे जर आपण त्यांना ज्ञान दिले. तर शंभर टक्के मुलांनाही ती आवड  लागते. असो आता त्या मुलीचे वय आम्हाला कळलं होतं ती मुलगी कोण व कुठून आली हे आम्हाला समजलं होतं त्या लहान अशा मुलीला आम्ही घेऊन निघालो. बालेकिल्ला वरती असलेले हे महादेवाचे ( बल्लाळेश्वर ) मंदिर या दिशेने आम्ही निघालो.फसगत आधीच झाली होती ती काळजी घेऊन आम्ही पुन्हा महादेवाच्या मंदिराच्या दिशेने पाऊलवाटेने निघालो.
वाट खूपच कठीण होती त्यामध्ये नववर्षाची पल्लवी आमच्या सोबत होती त्या पल्लवीचा ही मनोधैर्य खूपच मोठे होते ती खचली नाही.वडिलांचा हात धरून तर कधी बिंदास एकटीच  वरती जात होते.अक्षरशः दगडाला कसल्याच प्रकारचा आधार नसलेला बलेकिल्ल्यावरती जाण्याचा मार्ग होता. त्या मार्गावरती आम्ही चौघे व बाप लेक अशी मिळून आता सहा जण झालो होतो. बालेकिल्ल्याच्या दिशेने निघालो वरती गेल्यानंतर पडलेल्या अवस्थेमध्ये एक कबर दिसून आली.कदाचित ही कबर कोणाची आहे ?  कुठली आहे व तिथे काय होतं हे काही समजेना. तशी अद्यापही आम्हाला माहित नाही. संपूर्ण आजूबाजू पाहून झाल्यानंतर आम्ही तिथे वेळ न घालवता पुढे निघालो जाताना समाधानकारक म्हणून सुंदर अशी फुले दिसून आले. साई.संतोष यांनी ज्ञानेश्वर लगेच कामाला लागले. त्यांच्याबरोबर ती एक लहानशी मुलगी पल्लवी फुले तोडू लागली. व आम्ही महादेवाच्या मंदिराकडे निघालो.समोरच महादेवाचे मंदिर दिसत होते.गेल्यानंतर तिथे पाहिले साधारणता दोन ते तीन दिवसंपूर्वी कोणीतरी महादेवाला अभिषेक केलेला असेल असे दिसून आले.
आम्ही सर्वजण कामाला लागलो.तर संतोष पाणी आणण्यासाठी गेला. तर साई महादेवाच्या मंदिरासमोर असलेले सुंदर असे तळे त्या तळ्यामध्ये कमळाची फुले होती.महादेवाच्या पिंडी वरती वाहण्यासाठी फुले घेऊन साई आला.आल्यानंतर आम्ही महादेवाच्या पिंडीला अभिषेक करून महादेवाचे मंदिर सर्वप्रथमता स्वच्छ केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, हर हर महादेव,जय श्रीराम नमो पार्वती पते हर हर महादेव अशा घोषणा देऊन आम्ही नतमस्तक झालो. दर्शन घेतले महादेव मंदिराच्या दक्षिणेच्या बाजूला आम्हाला ध्वज दिसून आला.त्या ध्वजाच्या बाजूने आम्ही निघून गेलो. परंतु त्या बाजूलाच दुर्गवेध संघटना यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनावर अरुण अशी प्रतिमा त्या ठिकाणी बसवण्यात आली होती. तिथे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचे केला होता. आम्ही ते स्मारक पाहिले व पुन्हा पाणी घेऊन आलो महाराजांच्या मूर्तीच्या बाजूला काचेचे आवरण केले होते व ते खूप अस्वच्छ झाले होते. आम्ही ते पाण्याने स्वच्छ केले व आजूबाजूचे स्वच्छता करण्यासाठी संतोष व लहानशी पल्लवी स्वतःहून पुढे गेली. दोघे जण तिथेच गवत काढत स्वच्छता करत होते हे पाहून मन भरून आलं लहानपणापासूनच पल्लवीला गडांची ओढ आहे.गडाची स्वच्छता करण्याची आवड आहे.
पल्लवी आणि आम्ही सर्वजण पुन्हा महादेवाच्या मंदिरामध्ये क्षणभर विश्रांती घेण्यासाठी आलो. गप्पागोष्टी केल्या खूप मन रमला होते. वेळ कमी पडत होता दीड वाजले होते.आता परतीची वेळ आली होती. तिथून तर पाय निघत नव्हता, परंतु खाली उतरण हेही आवश्यक होतं म्हणून आम्ही एक ग्रुप फोटो घेतला व आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परंतु परतीचा प्रवास चढण्यापेक्षा हा परतीचा प्रवास खूपच अवघड होता. त्याचबरोबर नववर्षाची पल्लवी हिला घेऊन खाली उतरायचं होतं पण पल्लवी ( शिवकन्या )  ही गड किल्ल्यांच्या वाटेचा व वडिलांच्या व माझा (  सुभाष भोते )  हात धरत खाली उतरली. ती काही वेळा मध्येच आमच्यापुढे कधी आमच्यामध्ये अवघड वाटेमध्ये आम्ही तिला मध्ये घेतली. हळूहळू ती वाट आम्ही पूर्ण पार केले पल्लवीचे वडील ( दिनेश पाटील ) हे ही तेवढ्याच आवडीचे पल्लवीला हे संस्कार तिच्या वडिलांकडून मिळाले आहे. वडिलांना गडांची आवड तर मुलीला का नाही म्हणून मुलगी ही गडकिल्ल्यांसाठीच काम करणार व धर्मासाठीच काम करणार असे त्यांनी सांगितले. वाटेमध्ये जाताना गप्पागोष्टी करत करत पुन्हा खाली आलो.
जाताना पायऱ्यांच्या खाली गुफेमध्ये आमचे दोन साथीदार आमच्याबरोबर वरती आले होते ते म्हणजे जय वीरू आम्हाला ते पुन्हा त्याच गुफेत मिळाले पुन्हा येऊन भेटले व आता मी आठ जण पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो हळू हळू खाली उतरत असताना वनविभागाचे काही कर्मचारी आम्हाला दिसून आले ते कर्मचारी रस्त्यावरती येणारे गवत कापत होते परंतु ते कापलेले गवत त्यांनी काही उचलले नव्हते आता आमची उतरायची मोठी अडचण झाली होती कारण पाऊल ठेवला तर गौतावरून पाय घसरणार एक १०० मीटरचे हे अंतर आम्हाला पार करायचं होतं उताराने आम्ही हळूहळू खाली उतरलो. पुढे गेल्यानंतर ते कर्मचारी भेटले व त्यांना आम्ही विचारलं हे गवत सकाळी तर नव्हतं मग आता कसं त्यांनी सांगितलं की आम्ही हे गवत काढत आहोत व हे पूर्ण साफ ही करणार आहोत.
परंतु त्यांच्याशी बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा आम्ही खाली उतरण्याकडे जास्त लक्ष दिले आम्ही संपूर्ण गड खाली उतरून गावापाशी आलो. आता आमचा प्रवास संपला होता. आम्ही आता गाडीवरती बसून घरी निघणार होतो पल्लवी व तिचे वडील त्यांनी आमचा निरोप घेऊन तेही त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघाले. या सर्व अनुभवांमध्ये एक पहावयास मिळाले आपल्या भारतावरती इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं परंतु या दीडशे वर्षांमध्ये इंग्रजांनी आपली सर्वात मोठी हानी ही केली काही लोक म्हणतात इंग्रज आले देशाची सुधारणा झाली. परंतु देशाची सुधारणा कमी पण अधोगती जास्त झाली.कारण महाराष्ट्राचे व इतर काही राज्यांमधील हे गड किल्ले हे मराठ्यांचे अस्तित्व होते,शक्ती होती. इंग्रजांनी हेच ओळखून संपूर्ण या गडकिल्ल्यांचे नाशदूस केले होती. म्हणून तर मनामध्ये खूप राग येतो. एवढा सुंदर किल्ला अतिशय उत्तम पद्धतीने बनवलेला हा किल्ला त्याची कलाकृती त्या किल्ल्याची एवढ्या पद्धतीमध्ये नाशदूत झाली होती. अक्षरशः पाहताना खूप वाईट वाटत होतं मनामध्ये तेवढाच राग द्वेष इंग्रजांनी विरुद्ध मोगल शाही व निजामशाही यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर लढा दिला परंतु या लढ्यामध्ये मोगल शाईने किंवा निजामशाहीने कोणत्याच गडाचे नुकसान केले नाही.
त्यांना फक्त आपल्यावर राज्य करायचे होते ते ही संपूर्ण भारतावरती परंतु त्यांच्याच सोबतीला व्यापाराच्या महत्त्वकांक्षेनी हे इंग्रज भारतामध्ये आले व त्यांनी आपल्या देशावरती १५० वर्ष राज्य गेले. या दीडशे वर्षांमध्ये एवढी मोठी हानी करून गेले की ती अद्यापही आपल्याला सुधारता आली नाही राज्य सरकार व केंद्र सरकार पर्यटनाला सर्वात महत्त्वाचे स्थान देतात. परंतु पर्यटन क्षेत्र म्हणजे नवीन क्षेत्र उभारणे हे नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्यातील ३५० किल्ले हे किल्ल्यांचे पुनर्वसन केले तर पर्यटन कमी पडणार नाही. व हे हिंदवी स्वराज्य पुन्हा स्थापित होईल परंतु राज्य सरकार व केंद्र सरकार याकडे कसल्याच प्रकारचे लक्ष देत नाही. कसल्याच प्रकारच्या सुविधा नाहीत.
वनविभाग तर नाहीच नाही पुरातत्त्व विभागही लक्ष देत नाही.एकमेकांवरती आरोप करण्यात व पैसे खाण्यामध्ये हे दंग आहेत मनामध्ये विचार तर खूप आहेत परंतु असे विचार करून आम्ही चर्चा करून आमच्या गाडीचा प्रवासाला सुरुवात केली. मध्येच एका हॉटेलमध्ये जेवण करून आम्ही सहा वाजता कामशेत या ठिकाणी पोहोचलो.साईला चिंचवडला जायचे होते तो चिंचवडला गेला व आम्ही आमच्या घरी यामध्ये आजच्या भटकंतीमध्ये आम्हाला एक पहावयास मिळाले.गड किल्ले सुंदर असं स्वराज्य त्यातील सुंदर असे गड परंतु या गडांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे या गडांच्या संवर्धन झाले पाहिजे अनेक हिंदू संघटना यासाठी प्रयत्न करत आहेत परंतु पुरातत्व विभाग काही ठिकाणी आडकाठी करत आहे स्वतःही काम करत नाही आणि शिवभक्तांना ही काम करून देत नाही.काय करणार सरकार पुढे कोणाचे चालणार विचार तर खूप आहेत मनात परंतु आता मी विश्रांती घेतो.
धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव
(शब्दांकन- सुभाष भोते,गडकिल्ले प्रेमी,मावळ)

You missed

error: Content is protected !!