शिक्षिका शर्मिला गायकवाड यांचा सन्मान
वडगाव मावळ :
शाळा व विद्यार्थ्यांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका शर्मिला पंडित गायकवाड यांचा ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष दादा पवार, जिल्हा परिषद सदस्य रमेश दादा पाटील, गटविकास अधिकारी अशोक भवारी, गटशिक्षणाधिकारी डॉ. रूपाली खोमणे, शिक्षण विस्तार अधिकारी विद्या नाईकवाडी, केंद्रप्रमुख अर्जुन खेडेकर यांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बामाल्ली गावातील जिल्हा परिषद शाळेवर काम करताना गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी विविध उपक्रम राबवून शाळा प्रगत करण्यात यश मिळविले.

error: Content is protected !!