सुदवडीत पाणी पुरवठा योजनेला मंजुरी
सुदुंबरे:
सुदवडी येथे पाणी पुरवठा योजनेसाठी  3कोटी 2 लाख 69 हजार 60 पैसे  रुपयांची तांत्रिक मंजुरी मिळाली आहे,
सुदवडी येथे  जाधववाडी प्रकल्प मधून  या पाण्याचा उपसा केला जाणार आहे.
नजीकच्या  साई सृष्टी नगर, सुदवडी गावठाण, सुदापुल या परिसरात पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे,पाण्याच्या टाकीजवळ फिल्टर प्लांट बसवून स्वच्छ पाण्याचा पुरवठा या भागानां केला जाणार आहे, या  योजनेच्या तंत्रानि पाणी जिथून उचलायचे  आहे, व जिथे पाणी सुद्ध करून साठवायचे आहे, त्या भागात जाऊन प्लांटची पाहणी करून योजनेला हिरवा कंदील दिला आहे.
अत्याधुनिक पद्धतीने व पुढील लोकसंख्या विचारात घेऊन ही पाणीपुरवठा योजना साकारली जाणार आहे.जल जीवन मिशन अंतर्गत दूर दर्शी पाणी पुरवठा योजना आखण्यात आली आहे.ही पाणी पुरवठा पूर्ण झाल्याने  सुदवडी गावाला पुरेशा दाबाने स्वच्छ पाणी मिळणार आहे, या योजनेला अंतिम स्वरूप देण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घेतला असून अत्याधुनिक तंत्रन्यानाचा वापर करून ही योजना पूर्ण करावी असा आमदार सुनिल शेळके यांचा आग्रह आहे.

You missed

error: Content is protected !!