वडगाव मावळ:
मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघावर भाजपा,बाळासाहेबांची शिवसेना व आर.पी.आय.(A) महायुतीचा झेंडा फडकला.कांचंनताई नारायण भालेराव यांची चेअरमनपदी  अमित ओव्हाळ यांची व्हा.चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली.
माजी राज्यमंत्री बाळा  भेगडे,पच्छिंम महाराष्ट्र आर.पी.आय.(A) प्रमुख सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपाचे प्रभारी  भास्करराव म्हाळसकर, भाजप तालुकाध्यक्ष रविंद्र  भेगडे,मावळ तालुका आर.पी.आय.(A) अध्यक्ष नारायण  भालेराव, मा.सभापती गुलाब काका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम,आर.पी.आय.(A) युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष समीरजी जाधव,खादी ग्रामोद्योग संचालक पत्रकार सुदेश गिरमे,गणेश भांगरे,सूरज बुटाला,कल्पना. कांबळे यांच्यासह  अन्य संचालक,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You missed

error: Content is protected !!