राजपुरी एसटी  सुरू : विद्यार्थ्यांनी केला आनंदोत्सव पालक वर्गात आनंद
टाकवे बुद्रुक:
राजपुरी, शिंदे वस्ती, बेलज, भोईरकर पडाळ येथील शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी व त्या भागातील नागरिकांसाठी एसटी महामंडळाच्या लालपरी बस सुविधा सुरू  झाल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांची  होणारी पायपीट  थांबावी यासाठी तळेगाव आगार येथे तसेच आमदार सुनिल शेळके यांच्या कडे स्थानिक कार्यकर्त्यानी भेटी दिल्या. त्या भागातील विद्यार्थ्यांची व नागरिकांच्या प्रवासादरम्यान पायपीट होणाऱ्या गैरसोयीची  जाणीव संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. 
संबंधित अधिकाऱ्यांबरोबर समन्वय मीटिंग संपन्न झाल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये दीपावलीच्या सुट्टी असल्या कारणाने त्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दीपावली झाल्यानंतर शाळेच्या वेळेवरती विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी बस सुविधा सुरू करण्यात येईल.  अखेर त्या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यानी  प्रतिसाद देऊन या भागात बस सुविधा सुरू केली. सरपंच माधुरी अमीर जाधव, उपसरपंच सागर देवराम शिंदे ,सदस्य प्रियांका नारायण शिंदे, समीर छगन जाधव, सरपंच आंबी संगीता भरत घोजगे ,सरपंच आंबी सदस्य बायडाबाई बाबासाहेब घोजगे सारिका रामनाथ धुमाळ सदस्य उपसरपंच प्रदीप बनसोडे शालेय अध्यक्ष दत्ता मारुती वाघमारे राजपुरी योगेश शिंदे पोलीस पाटील यांनीही या साठी विशेष प्रयत्न केले. प्रयत्नातून आजा राजपुरी ते टाकवे एसटी सुरू झाली आहे.टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गटाचे अध्यक्ष रोहिदास असवले यांनीही या समस्ये बाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केला असल्याचे असवले यांनी सांगितले.
राजपुरी या भागात बस सुरू झाल्यामुळे गावातील नागरिकांनी व महिलांनी गाडीचे औक्षण   करून बस वाहक व चालक  यांचा देखील सत्कार केला. या भागातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. तसेच रोहिदास असवले व त्यांचे सहकारी यांनी पाठपुरावा केला. तसेच तळेगाव एसटी आगार अधिकारी यांचे  देखील  त्याबद्दल गावातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनापासून आभार मानले असल्याचे उपसरपंच सागर शिंदे यांनी सांगितले.

error: Content is protected !!