वडगाव मावळ:
मावळ तालुका कुस्ती संघाच्या मान्यतेने व काले ग्रामस्थांच्या वतीने मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा आयोजन करण्यात आले आहे .मावळ तालुक्यातील कुस्तीगीर ,पालक कुस्ती शौकीन वस्ताद व मार्गदर्शक यांना परिचय पत्रकाद्वारे ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
  महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची 65 वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2022 कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार आहे. पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेसाठी मावळ तालुका कुस्ती संघाचे वरिष्ठ माती व गादी आणि कुमार व बालगट निवड चाचणी स्पर्धा होणार आहे.
   गुरुवार दिनांक 1 डिसेंबर 2022 रोजी काले येथे या स्पर्धा होणार आहे .नव्याने कुस्ती आखाडा होणार आहे ,यावेळी कुस्ती आखाड्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे .याच दिवशी गुरुवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत असून दुपारी दोन वाजता आखाड्याचे उद्घाटन व कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे. कुस्ती स्पर्धेसाठी गटनिहाय वजन बालगट चौदा वर्षाखालील 25, 28, 32, 38 ,35, 38, 42 किलो .
   कुमार गटासाठी सतरा वर्षाखाली 45, 48 ,51 ,55, 60, 65, 71, 80, 92, 110 वरिष्ठ माती व गादी विभागासाठी 57, 51, 65 ,70 ,74, 86, 92, 97 महाराष्ट्र केसरी साठी 86 ते 125 किलो वजन गटात स्पर्धा कुस्ती स्पर्धा होणार आहे. कुस्तीगीर पालक कुस्ती शौकीन यांच्या माहितीसाठी ज्या कुस्तीगरांची कायम रजिस्ट्रेशन नाव नोंदणी झाली आहे .त्याच कुस्तीगीरांना या स्पर्धेमध्ये खेळता येईल मात्र ज्यांचे नाव नोंदणी झाली, नाही अशा कुस्तीगिऱ्यांना नव्याने नाव नोंदणी केल्यावरच कुस्ती खेळता येणार आहे .
   अन्यथा त्यांना कुस्ती खेळता येणार नाही याची नोंद घ्यावी लागणार आहे .नवीन नोंदीसाठी कुस्तीकरांनी आयकार्ड साईज  तीन फोटो, ओरिजनल आधार कार्ड व आधार कार्ड च्या तीन छायांकित प्रति व शंभर रुपये रजिस्ट्रेशन फी सोबत आणावी असे आव्हान संयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे.
    त्यानंतरच नाव नोंदणी केली जाणार आहे. नाव नोंदणी नंतर नवोदीत कुस्तीकरांना कोणत्याही स्पर्धेत खेळता येईल अन्यथा खेळता येणार नाही, या कुस्ती स्पर्धेसाठी नाव नोंदणी आवश्यक संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे .अधिक माहितीसाठी पैलवान बंडू येवले (सचिव मावळ तालुका कुस्तीगीर संघ) मोबाईल नंबर 97 63 47 64 82 ,पै. खंडू वाळुंज (उपाध्यक्ष मावळ तालुका कुस्तीगीर संघ) 98 22 64 54 50 ,पप्पू कालेकर (सहसचिव मावळ तालुका कुस्तीगीर संघ) 96 73 26 95 41 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून कुस्तीगीर आणि कुस्ती सेवकांना अधिक माहिती घेता येणार आहे.

You missed

error: Content is protected !!