तळेगाव स्टेशन:
सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी (वूमन), सुदुंबरे, पुणे यांनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी चार दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित केले होते.
या शिबीर रुबीकॉन बार्कलेज यांच्यासोबत असलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत  पार पडले.प्रशांत सोनावणे यांनी विद्यार्थ्यास प्रशिक्षण दिले . या प्रशिक्षणादरम्यान युवा नेतृत्व, सादरीकरण कौशल्ये आणि इंग्रजी संभाषण यासारख्या विविध पैलूवर विशेष भर होता.
  सिद्धांत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे कार्यवाह मिहीर यादव आणि  शनन यादव उपस्थित होते . कार्यक्रमाचे नियोजन अविनाश माने यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्रेया गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाची संकल्पना प्राचार्य सागर कोरे यांची होती.

error: Content is protected !!