हरिनामाच्या जयघोषात  दुमदुमून गेली पवनानगरी
पवना शिक्षण संकुलात  दिंडी सोहळ्याचे आयोजन
पवनानगर:
सांप्रदायिक क्षेत्राचे कार्य व संताचे विचार विद्यार्थ्यांना ज्ञात झाल्यास बालवयातच त्यांच्यावर संस्कार होतात  त्यामुळे शालेय पातळीवर असे दिंडी सोहळ्यांची गरज असल्याचे मत आखील वारकरी संघाचे अध्यक्ष शांताराम महाराज बोडके यांनी पवनानगर येथे व्यक्त केले
पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर व लायन शांता मानेक पवना जुनिअर कॅालेज, कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे पवना प्राथमिक विद्यालयाच्या वतिने घेण्यात आलेल्या दिडीं सोहळ्याने पवनानगरीला भक्तीमय आळंदीचे स्वरूप आले होते.भाविकांनी या
पाळखीचे दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील  शाळेने कार्तिकी महाएकादशी व आळंदी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकऱयांची वेषभुषा करून या दिंडीमध्ये शाळेतील एक हजार विध्यार्थी सहभागी झाले होते तर संत ज्ञानेश्वर, नामदेव,तुकाराम,मुक्ताबाई या संताच्या वेषभुषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात त्यांची पालखीबरोबर मिरवणुक काढण्यात आली होती.
सकाळी आठ वाजता सांप्रदायिक क्षेत्रातील आखील भारतीय वारकरी संघाचे अध्यक्ष  शांताराम महाराज बोडके, इको गोधामचे संस्थापक नितिन घोटकुले, माजी सभापती निकीताताई घोटकुले,सरपंच खंडु कालेकर,प्राचार्या अंजली दौंडे  यांच्या हस्ते 
माऊलींच्या प्रतीमचे व पालखीचे व विना पुजन करण्यात आले.
यावेळी  शांतारम  बोडके  महाराज बोलताना म्हणाले कि,दिंडी सोहळा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांवर बालवयातच संस्कार होतात त्यामुळे संपूर्ण सांप्रदायिक क्षेत्राचे कार्य व संताचे विचार विद्यार्थ्यांना ज्ञात होतात त्यामुळे शालेय पातळीवर असे दिंडी सोहळ्यांची गरज आहे.
यावेळी माजी उपसरपंच अमित कुंभार ,प्रविण घरदाळे ,संदिप भुतडा,संजय मोहळ, ज्ञानेश्वर आडकर, शाळेच्या पर्येवेक्षिका निला केसकर, शालेय समिती सदस्य प्रल्हाद कालेकर, मुकूंद ठाकर, माऊली ठाकर, अरूण नायर, फुलाबाई कालेकर जयश्री पवार, पोलिस पाटील सीमा यादव, आखीव भारतीय वारकरी सांप्रदायाचे प्रसिध्दी प्रमुख सचिन ठाकर, काशिनाथ भोंडवे, गोरख घोजगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्तित होते.
दिंडी सोहळ्याचे प्रमुख गणेश ठोंबरे,संजय हुलावळे, राजकुमार वरघडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी शाळेतुन निघाल्यानंतर पवनानगर पाटबंधारे वसाहत येथुन पवनानगर चौक,काले गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पर्यंत पालखी नेण्यात आली.
दिंडीमध्ये  भजन पथका बरोबरच लेझिम पथक,वृक्ष दिंडी,ग्रंथ दिंडी,पर्यावरण दिंडी यांनी सहभाग घेतला होता या पथकांनी प्रत्येक चौकात प्रात्यक्षिके दाखवुन नागरिकांची वाहावाह मिळविली.
दिंडीचे हे २५ वे वर्ष असुन अनेक ठिकाणी दिंडीचे जोरदार स्वागत केले.अनेक ठिकाणी ग्रामस्थ व शिक्षक यांनी सांप्रदायिक खेळ, फुगडी खेळत दिंडीत सहभागी झाले होते.त्यामुळे पवनानगरला आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले होते हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.महिलांनी जागोजागी पालखीची ओवाळणी करून पुजन केले.
पवनानगर व्यापारी मित्र मंडळ,मार्च ९९-२००० बॕच,पाठबंधारे वसाहत व सामाजिक संस्थांनी   विद्यार्थांंना जागोजागी खाऊ व फराळाचे वाटप केले.
काले ग्रामस्थांनी काले गावाच्या वेशीवर भजन मंडळ घेऊन येत पालखीचे उत्साहात स्वागत केले.
  काले येथील विट्ठल रूक्मिणी मंदिरात आरती घेऊन  फराळाचे वाटप करत पालखीचा समारोप करण्यात आला.
दिंडी सोहळ्याचे आयोजन  नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व पवना शिक्षण संकुलाचे अध्यक्ष संतोष खांडगे, प्राचार्या अंजली दौंडे, पर्यवेक्षिका निला केसकर यांंच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख गणेश ठोंबरे,संजय हुलावळे,राजकुमार वरघडे , पवना शिक्षण संकुलातील सर्व शैक्षणिक विभागाचे प्रमुख व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचा-यांनी यशस्वी संपन्न केले.

error: Content is protected !!