सुदुंबरे:
सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी (वुमन), पुणे मध्ये दक्षता जनजागृती सप्ताह अंतर्गत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.त्यानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सागर मांजरे- सिद्धांत कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीचे प्राचार्य यांनी ‘भ्रष्टाचारमुक्त भारत – विकसित भारत’या विषयावर  व्याख्यान दिले.
त्यांनी भ्रष्टाचाराशी संबंधित वेगवेगळे कायदे समजावून सांगितले. त्यांनतर सर्वाना दक्षतेची प्रतिज्ञा दिली गेली. श्रेया गायकवाड यांनी आभाप्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाचे आयोजन कु. अबोली जोरी आणि कु.काजल भंडारे यांनी केले होते.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सागर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.संस्थेचे कार्यवाह श्री. सिद्धांत आणि मिहिर यादव यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रोत्साहन दिले.

You missed

error: Content is protected !!