सुदुंबरे:
सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी (वुमन), सुदुंबरे येथे माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी  यांची पुण्यतिथी  आणि  सरदार वल्लभभाई पटेल यांची  जयंती साजरी करण्यात आली.
महविद्यालयाचे प्राचार्य सागर कोरे यांच्या हस्ते स्व.इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
प्राचार्य कोरे यांनी  स्व.इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याची  माहिती दिली. प्राध्यापिका श्रेया गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी सिद्धांत स्कूल ऑफ फार्मसी वुमेन सर्व विद्यार्थी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.
राष्ट्रीय एकता दिनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. अबोली जोरी कार्यक्रमाचे नियोजन केले. काजल भंडारे यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!