सिने अभिनेते ,दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते प्रा. संभाजी मलघे यांचा कविता संग्रह प्रकाशित
तळेगाव दाभाडे:
सिने अभिनेते,प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संभाजी मलघे सर यांचा  “अस्वस्थ भवताल” नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध  झाला आहे.
आडकर फाउंडेशन, इस्कॉन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृती प्रकाशन पुणे यांच्यावतीने अस्वस्थ भवताल हा कवितासंग्रह पत्रकार भवन पुणे येथे प्रकाशित करण्यात आला .
सदर कार्यक्रमाचे आयोजन आडकर फाउंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. मिलिंद जोशी, पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार भारत सरकार सचिन
ईटकर, अँड. प्रमोद आडकर, अध्यक्ष आडकर फाउंडेशन पुणे. संस्कृती प्रकाशन पुणे यांच्या प्रकाशक सुनिताराजे पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी डॉक्टर संभाजी मलघे यांच्या कवितासंग्रहाचे तोंड भरून कौतुक केले. समाजामध्ये चालणारी खदखद व अस्वस्थता या कवितासंग्रहातून मांडल्या बाबत सर्व स्तरातून या पुस्तकाचे स्वागत होत आहे.
डॉ. सतीश देसाई यांनी अस्वस्थ भवताल या कवितासंग्रहातील कवितांचे वाचन करून दाद मिळवली .
हा कवितासंग्रह हा समाजासाठी प्रेरणादायी असून समाजाचा आरसा म्हणून सदर कवितासंग्रहाकडे सर्व महाराष्ट्राने पहावे असे गौरवोद्गार दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी याप्रसंगी काढले. इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे आधारस्तंभ माजी आमदार कृष्णराव भेगडे , इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे कार्यवाहक चंद्रकांत शेटे,खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. देवेंद्र बुट्टे पाटील यांनी प्राध्यापक मलघे यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!